मुंबई - लोकसभा निवडणूकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज होत असताना २०१४ मध्ये निवडणूकीत दोघा पोलिसांनी केलेल्या कामाचा प्रलंबित मोबदला देण्याला गृह विभागाला मुहूर्त मिळाला आहे. पोलीस निरीक्षक भागवत चौधरी व कॉन्स्टेबल शंकर कवठेकर यांचे निवडणूकीचे मानधन या वर्षाच्या वित्तीय तरतुदीतून अदा करण्याला मान्यता देण्यात आली आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणूकीत आचारसंहिता लागू झाल्यापासून ते निवडणूकाचे काम पुर्ण होईपर्यत या कामासाठी नियुक्त झालेल्या पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मानधन १६ नोव्हेंबर २०१७ मध्ये देण्याला शासनाने मंजुरी दिली. मात्र त्यावेळी अलिबाग पोलीस ठाण्यात नियुक्तीला आलेल्या निरीक्षक चौधरी व मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल कवठेकर यांचे मानधन काढण्यात आले नव्हते. त्यांचे वेतन काढण्याचा प्रलंबित राहिला होता.
अखेर ‘त्या ’पोलिसांना मिळाला निवडणूक कामाचा मोबदला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 9:58 PM
विधानसभा निवडणूकीतील मानधन प्रलंबित
ठळक मुद्देपोलीस निरीक्षक भागवत चौधरी व कॉन्स्टेबल शंकर कवठेकर यांचे निवडणूकीचे मानधन या वर्षाच्या वित्तीय तरतुदीतून अदा करण्याला मान्यता देण्यात आली आहे.अलिबाग पोलीस ठाण्यात नियुक्तीला आलेल्या निरीक्षक चौधरी व मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल कवठेकर यांचे मानधन काढण्यात आले नव्हते. त्यांचे वेतन काढण्याचा प्रलंबित राहिला होता.