शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

...अखेर चुकीची दुरुस्ती, २४७ अंमलदाराच्या पदोन्नतीसह बदल्या केल्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 9:32 PM

मुंबईतील१७७ जणांचा समावेश

ठळक मुद्देमहानिरीक्षक ( आस्थापना) राजेश प्रधान यांनी गुरुवारी त्याबाबतचे आदेश जारी केले . त्यामुळे सबधितांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

मुंबई  -   सेवानिवृत्तीला अवघी काही वर्षे शिल्लक राहिली  असताना  अंमलदाराना मूळ घटकांपासून ४००,५०० किलोमीटर दुरच्या ठिकाणी बदली करण्यातील चूक अखेर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या  अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना उमगली आहे.  उपनिरीक्षक म्हणून बढती देताना  अन्य घटकांत बदली केलेल्या राज्यातील २४७ अधिकाऱ्याच्या बदल्या रद्द करून त्यांना मूळ घटकात नेमण्यात आले आहे. महानिरीक्षक ( आस्थापना) राजेश प्रधान यांनी गुरुवारी त्याबाबतचे आदेश जारी केले . त्यामुळे सबधितांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 

बदली रद्द झालेल्यामध्ये मुंबईतील १७७ पीएसआयचा समावेश आहे. उपनिरीक्षकाच्या अहर्ता परीक्षा २०१३मधील  उत्तीर्ण १०६१ अंमलदाराना २२ ऑक्टोबरला पदोन्नतीचे आदेश प्रधान यांनी जारी केले होते. मात्र सद्या कार्यरत असलेल्या घटकांत रिक्त जागा असताना त्यांना रोटेशन पद्धतीने  नागपूर, अन्य ठिकाणी बदली केली होती. एका ठिकाणी ३२,३३ वर्षे सेवा केल्यानंतर नोकरीची काही वर्षे शिल्लक असताना त्यांच्या अन्यत्र बदल्या केल्याने कौटुंबिक व अन्य समस्यांना सामोरे जावे लागणार  होते, या विक्षिप्त धोरणामुळे संबधितांकडून नाराजी व्यक्त होत होती. बदली रद्द करण्यासाठी घटक प्रमुखाकडून२४७ जणांनी अर्ज केले होते. अखेर चूक लक्षात आल्याने  त्याची दखल प्रधान यांनी पूर्वीचा आदेश रद्द केला. सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणी पदोन्नती देण्याच्या सूचना घटक प्रमुखांना केल्या आहेत.४०० अधिकाऱ्याच्या बदल्याचे गॅझेट 

महासंचालक कार्यालयातून  होणाऱ्या सर्वसाधारण बदल्यासाठी ५ वेळा मुदतवाढीला  ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे.  मात्र शुक्रवारी ईद मिलादची सुट्टी असल्याने आज अखेरची मुदत होती. तो मुहूर्त  साधत  निशस्त्र,राखीव दल, वायरलेस, एमटी  आदी विभागातील सुमारे ४००वर  निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र विनंतीच्या बदल्या अमान्य करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईTransferबदली