शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

FIR Against Sundar Pichai: Google चे CEO सुंदर पिचाई यांच्याविरोधात मुंबईत एफआयआर; पाहा काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 4:47 PM

FIR Against Google CEO: मुंबई पोलिसांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. न्यायालयाच्या एका आदेशानंतर एफआयआर करण्यात आला दाखल.

FIR Against Google CEO: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. एका न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी पिचाई यांच्याविरोधात कॉपी राईटच्या कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे.

आपण बनवलेला चित्रपट यूट्यूबवर (Youtube) अपलोड करण्यात आला आहे, अशी तक्रार भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी न्यायालयासमोर केली. त्यानंतर न्यायालयानं मुंबई पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले होते. याच आदेशानंतर एमआयडीसी पोलिसांनी पिचाई यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

काय म्हटलंय तक्रारदारानं?आपण 'एक हसीना थी एक दिवाना था' चित्रपटाचे कॉपीराइट कोणालाही दिलेले नाहीत. असं असूनही या चित्रपटाची गाणी आणि व्हिडीओ अनेकांनी गुगल आणि यूट्यूबवर अपलोड केले आहेत, असं सुनील दर्शन यांनी सांगितलं. चित्रपटाची गाणी आणि व्हिडीओ अपलोड होत असतानाच यूट्यूब आणि गुगलनेही अपलोड करण्याची परवानगी दिली. यामुळे त्यांनी कोट्यवधी रुपये कमावले आणि आपलं (चित्रपट निर्मात्यांचं) कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचं ते म्हणाले. 

तक्रारदाराच्या तक्रारीच्या आधारे, सुंदर पिचाई यांच्याव्यतिरिक्त, गौतम आनंद (यूट्यूबचे एमडी) यांच्यासह इतर Google च्या अधिकार्‍यांवर कॉपीराइट कलम ५१, ६३ आणि ६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :googleगुगलSundar Pichaiसुंदर पिचईCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई