Payal Rohatgi: महात्मा गांधी, काँग्रेस परिवाराची बदनामी; पुण्यात अभिनेत्री पायल रोहतगी हिच्याविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 10:11 IST2021-09-01T10:11:01+5:302021-09-01T10:11:44+5:30
Payal Rohatgi Controversy: बॉलीवूड अभिनेत्री पायल रोहतगी हिने यापूर्वी अनेकदा काँग्रेस व नेहरु घराण्यावर टिका केली होती. त्याबद्दल तिला यापूर्वी अटकही करण्यात आली होती.

Payal Rohatgi: महात्मा गांधी, काँग्रेस परिवाराची बदनामी; पुण्यात अभिनेत्री पायल रोहतगी हिच्याविरोधात गुन्हा दाखल
पुणे : वादग्रस्त ट्विट करुन नेहमी चर्चेत राहणार्या अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi) विरोधात पुण्यातील शिवाजीननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महात्मा गांधी आणि काँग्रेस परिवाराची बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पुणे जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यावरुन पायल रोहतगी व व्हिडिओ तयार करणाºया अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (FIR has been registered against actress Payal Rohatgi in Pune.)
राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी व त्यांचे कुटंबिय, काँग्रेस परीवार यांच्याविषयी खोटा बदनामीकारक व्हिडिओ तयार करुन तो सोशल मिडियावर पायल रोहतगी हिने प्रसारित केला. त्यातून हिंदु -मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. संगीता तिवारी यांनी अगोदर ही तक्रार सायबर पोलिसांकडे दिली होती. सायबर पोलिसांनी ती शिवाजीनगर पोलिसांकडे वर्ग केला आहे.
बॉलीवूड अभिनेत्री पायल रोहतगी हिने यापूर्वी अनेकदा काँग्रेस व नेहरु घराण्यावर टिका केली होती. त्याबद्दल तिला यापूर्वी अटकही करण्यात आली होती. वादग्रस्त पोस्ट टाकायची नंतर अंगाशी आले की माफी मागायची अशी तिची आजवर सोशल मिडियावरील वाटचाल राहिली आहे. तिने सती प्रथेचे समर्थन करुन वाद ओढवून घेतला होता.