बदल्याची आग! पत्नीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्यांना 'त्यानं' दिली थरकाप उडवणारी शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 07:45 PM2022-01-09T19:45:07+5:302022-01-09T19:45:40+5:30
Murder Case : तपासादरम्यान गावातील एक जोडपे खुनाच्या दिवसापासून बेपत्ता असल्याचे निष्पन्न झाले. सांवरिया दर्शनाला गेल्याचे आधी सांगण्यात आले होते, पण त्याचा मोबाईल डायल केला असता तो बंद असल्याचे आढळले.
रतलाम : मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात एक असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्याची कथा संपूर्ण फिल्मी आहे. प्रत्यक्षात तीन जणांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. बदला घेण्यासाठी पीडितेच्या पतीने एका आरोपीला बॉम्बने (डायनामाइट) उडवले. पतीने इतर दोन आरोपींनाही मारण्याचा कट रचला होता पण त्यापूर्वीच तो पोलिसांच्या हाती लागला.
प्रकरणाबद्दल अधिक माहिती जाणून घ्या
४ जानेवारी रोजी रतलाम जिल्ह्यातील एका गावात बॉम्ब पेरून एका शेतकऱ्याची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली होती. शेतकऱ्याचा मृत्यू एवढा वेदनादायी होता की मृतदेहाच्या चिंधड्या उडाल्या. प्राथमिक तपासात पोलिसांना कळले की, हे हत्येचे प्रकरण आहे आणि आधीच स्फोटकं पेरून पूर्णपणे नियोजन होते आणि मोटरच्या स्टार्टरला जोडले गेले होते. यानंतर पोलिसांनी एसआयटी स्थापन करून प्रकरणाचा तपास सुरू केला.
तपासादरम्यान गावातील एक जोडपे खुनाच्या दिवसापासून बेपत्ता असल्याचे निष्पन्न झाले. सांवरिया दर्शनाला गेल्याचे आधी सांगण्यात आले होते, पण त्याचा मोबाईल डायल केला असता तो बंद असल्याचे आढळले. यानंतर या दाम्पत्यावरील पोलिसांचा संशय अधिकच बळावला. पोलिसांनी तपास करून जोडप्याला मध्यप्रदेशातील मंदसौर येथून ताब्यात घेतले.
दोघांची चौकशी केली असता, आधी पतीने उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली, मात्र नंतर पोलीस खाक्या दाखवल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. आरोपी सुरेशने जानेवारीच्या रात्री मृत लालसिंगच्या शेतात जिलेटिन आणि डिटोनेटर पुरून मोटारच्या स्टार्टरला जोडल्याचे सांगितले. शेतकऱ्याने मोटार चालवण्यास सुरुवात करताच स्फोटाने त्याचे शरीराच्या चिंधड्या झाल्या.
सूडाची कहाणी!
पोलिसांनी हत्येचे कारण विचारले असता, आरोपी सुरेशने धक्कादायक खुलासा केला. सुरेशने सांगितले की, मृत लाल सिंग आणि त्याचे दोन साथीदार भंवरलाल आणि दिनेश यांनी वर्षभरापूर्वी त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केला होता. ही घटना कोणाला सांगू नकोस, अशी धमकी आरोपीने दिली होती. तेव्हापासून सुरेश सुडाच्या आगीत जळत होता आणि या सूडपोटी त्याने तिघांच्याही हत्येचा कट रचला.
लालसिंगप्रमाणे सुरेशने भंवरलालला बॉम्बने उडवण्याचा कट रचला होता, पण तो काही कारणाने वाचला. लालसिंगनंतर सुरेशलाही भंवरलाल आणि दिनेशला मारायचे होते. चौकशीत सुरेशने सांगितले की, स्फोटासाठी त्याने डिटोनेटर आणि जिलेटिन जवळच्या गावातील बद्री पाटीदाराकडून घेतले होते. बद्री बेकायदेशीरपणे जिलेटिन आणि डिटोनेटर्सची विक्री करत होता.