ठाणे - मुंबईतील हॉटेल व्यावसायिक मेहबूब खान (42, रा. खार, मुंबई) यांच्यावर खारेगाव टोल नाक्याकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर कळवा येथे गोळीबार झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोराविरुद्ध खूनाचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ हाताला गोळी लागल्याने खान या हल्ल्यातून सुदैवाने बचावले आहेत.खार येथे हॉटेलचा व्यवसाय करणारे खान हे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी 12 ऑक्टोबर रोजी मुंब्रा येथे आले होते. रात्री पावणो 12 वाजण्याच्या सुमारास ते पत्नी आणि पाच वर्षीय मुलीसह मीरा रोड येथील आपल्या दुसऱ्या घरी ते कारने जात होते. ते खारेगाव टोल नाक्याकडे जाणाऱ्या सेवा रस्त्याने डावीकडील वळणावर असताना मोटारसायकलवरुन त्यांच्या उजव्या बाजूने आलेल्या एका हल्लेखोराने त्यांच्यावर रिव्हॉल्व्हरने गोळीबार करुन त्यांच्या खूनाचा प्रयत्न केला. सुदैवाने ही गोळी त्यांच्या कारच्या ड्रायव्हर बाजूकडील काच फोडून उजव्या हाताच्या दंडामध्ये शिरली. गंभीर जखमी झालेल्या खान यांना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोरांना शोधण्यासाठी दोन पथकांचीही निर्मिती करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक एस. व्ही. आजगावकर यांनी दिली. कळवा पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोराविरुद्ध 13 ऑक्टोबर रोजी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉटेल व्यावसायिकावर कळव्यात गोळीबार; गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 21:37 IST
केवळ हाताला गोळी लागल्याने खान या हल्ल्यातून सुदैवाने बचावले आहेत.
हॉटेल व्यावसायिकावर कळव्यात गोळीबार; गंभीर जखमी
ठळक मुद्देयाप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोराविरुद्ध खूनाचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदैवाने ही गोळी त्यांच्या कारच्या ड्रायव्हर बाजूकडील काच फोडून उजव्या हाताच्या दंडामध्ये शिरली.