पिंपरी : तळोजा कारागृहातून बाहेर येताच कुख्यात गुंड गजानन मारणे टोळीने बेकायदा जमाव जमवून फटाके वाजवले. तसेच आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. केला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाका येथे सोमवारी (दि. १५) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी मारणेसह त्याच्या साथीदारांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून खटल्याप्रकरणी मुक्तता झाल्यानंतर कुख्यात गुंड मारणे याची सोमवारी तळोजा कारागृहातून सुटका झाली. त्यावेळी त्याचे स्वागत करण्यासाठी कारागृहाबाहेर त्याचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषणाबाजी करून समर्थकांनी पोलिसांना आव्हान दिले. त्यानंतर मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या ताफ्यासह मिरवणूक काढली. उर्से टोलनाका येथे जोरदार घोषणाबाजी करत फटाके वाजवले. तसेच आरडाओरडा करून त्याचे ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने चित्रिकरण करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ड्रोन कॅमेरा ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल केला.
तुरुंगातून सुटताच कुख्यात गुंड गजानन मारणे गॅंगविरोधात पहिला गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 2:14 PM
Crime News : याप्रकरणी मारणेसह त्याच्या साथीदारांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाका येथे सोमवारी (दि. १५) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.