groom demand dowry from bride side: उत्तर प्रदेश कौशांबी जिल्ह्यात एका नवरदेवाने हुंड्यासाठी लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच पत्नीला त्रास देणं सुरू केलं. असं सांगण्यात आलं की, हुंड्यात 25 लाख रूपयांची डिमांड पूर्ण झाल्याने नवरदेवाने आपल्या परिवारासोबत मिळून नवरीला त्रास दिला. नवरीकडून पोलिसात देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, जेव्हा नवरी सासरी आली तेव्हा 25 लाख रूपये अतिरिक्त हुंड्यासाठी तिला त्रास देण्यात आला.
एफआयआरनुसार, नवरीने सांगितलं की, तिचा पती तिच्यापासून दूर राहत होता. जेव्हा तिने पतीला दूर राहण्याचं कारण विचारलं तो म्हणाला की, तू माझ्यासोबत संबंध ठेवण्याच्या लायकीची नाही. इतकंच नाही तर पतीने पत्नीला त्याच्या भाओजीसोबत अनैतिक संबंध ठेवण्यासाठीही दबाव टाकला. ज्याचा महिलेने विरोध केला तेव्हा तिला मारहाण केली गेली.
नंतर हे सगळं महिलेने आपल्या माहेरच्या लोकांना सांगितलं. ज्यानंतर अनेकदा पंचायत बोलवण्यात आली. पण सासरच्या लोकांनी काही परत देण्यास नकार दिला. अशात महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.
पीडित महिलेने सांगितलं की, ती बेरूआ गावातील राहणारी आहे. 16 फेब्रुवारी 2022 ला हिंदू रितीरिवाजानुसार तिचं लग्न शिवांश त्रिपाठीसोबत झालं होतं. तिच्या वडिलांनी नवरदेवाला 25 लाख रूपये कॅश आणि एक स्विफ्ट कार दिली होती. लग्नात आठ लाख रूपये किंमतीचे दागिने आणि काही वस्तू देऊन मुलीची पाठवणी केली होती. जेव्हा ती सासरी आली तेव्हा सासरच्या लोकांनी तिला माहेरून आणखी 25 लाख रूपये आणण्यास सांगितलं.
इतकंच नाही तर लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून तिचा पती तिच्यापासून दूर राहत होता. जेव्हा तिने पतीला दूर राहण्याचं कारण विचारलं तर तो म्हणाला की, ती त्याच्यासोबत संबंध ठेवण्याच्या लायक नाही. तसेच त्याने तिला त्याच्या भाओजीसोबत अनैतिक संबंध ठेवण्यास सांगितलं. ज्याच्या महिलेने विरोध केला आणि मग तिला मारहाण करण्यात आली.