झारखंडमध्ये रांची सिव्हिल कोर्टाच्या परिसरात एका वकिलाला त्याची पत्नी आणि इतर लोकांनी बेदम मारहाण केली. वकिलाच्या पत्नीचा आरोप आहे की, तिचा पती चौथं लग्न करण्याच्या तयारीत होता. ही बाब पहिल्या पत्नीला समजली तेव्हा ती कोर्टात पोहोचली आणि वकील पतीला मारहाण केली.
वकील आणि त्याच्या पत्नीमधील हा हाय व्होल्टेज ड्रामा कोर्ट परिसरात चर्चेचा विषय ठरला. पती-पत्नीमध्ये सुरू असलेला हा ड्रामा पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दीही झाली होती. त्यांनी वकिलाला मारहाण केली. वकिलाच्या दोन पत्नींचा आरोप आहे की, त्यांचा पती त्यांना फसवून चौथं लग्न करणार होता, जे त्यांना समजलं.
नईमुद्दीन उर्फ नूरी वकिलाच्या दोन पत्नींनी आरोप केला की, पतीचे त्याच्या ज्यूनिअर महिला वकिलासोबत अनैतिक संबंध आहेत. त्यांनी वकील पतीवर चौथं लग्न करणार असल्याचा आरोप केला. वकिलाच्या दोन्ही पत्नींनी पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.
वकील नूरी उर्फ नईमुद्दीन रांची सिव्हिल कोर्टात प्रॅक्टिस करतो. वकीलाच्या दोन पत्नींचं म्हणणं आहे की, त्या त्यांच्या पतीसोबत बोलण्यासाठी आल्या होत्या. यावेळी नईमुद्दीन अन्सारी उर्फ नईमुद्दीन याने पत्नींसोबत अभद्र भाषेचा वापर केला. आरोप असाही आहे की, वकिल नईमुद्दीन याने पत्नी शहला तबस्सुमला मारहाण केली. तिला वाचवण्यासाठी मधे आलेली दुसरी पत्नी शमा परवीनलाही त्याने मारहाण केली. नईमुद्दीनची पहिली पत्नी शहला तबस्सुम सुद्धा रांची सिव्हिल कोर्टात वकील आहे. तिला मारहाण होताना पाहून इतर वकिलांनी नईमुद्दीनला मारहाण केली.