शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पाच घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक; तिघांनी गोव्यातून पासपोर्ट काढल्याचे उघड

By नारायण बडगुजर | Published: January 22, 2024 10:13 PM

इतर दोन संशयितांचे पासपोर्ट लवकरच येणार होते. याबाबत दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यांनी छापा टाकून पाच संशयितांना पकडले. 

पिंपरी : कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांशिवाय देशात घुसखोरी करून वास्तव्य करणार्‍या पाच बांगलादेशी नागरिकांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दहशतवाद विरोधी पथकाने आणि निगडी पोलिसांनी जेरबंद केले. निगडी येथील अंकुश चौकातील साईनाथ नगरमधील काळभोर चाळीत शनिवारी (दि. २०) रात्री नऊच्या सुमारास ही कारवाई केली. धक्कादायक म्हणजे संशयितांपैकी तीन जणांनी गोवा येथून पासपोर्टही काढल्याचे समोर आले आहे. या पासपोर्टद्वारे ते लवकरच परदेशात जाण्याच्या तयारीत होते.

रॉकी सामोर बरूआ (वय २८), जयधन अमीरोन बरूआ (२८), अंकुर सुसेन बरूआ (२६), रातुल शील्फोन बरूआ (२८), राणा नंदन बरूआ (२५, सर्व रा. चित्तागोंग, बांगलादेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह साईनाथ सर (रा. चंदननगर, पुणे), जिकू दास उर्फ जॉय चौधरी (रा. चंदननगर, पुणे व मडगाव, गोवा) या दोघांच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार सुयोग लांडे यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व संशयित हे बांगलादेशी नागरिक आहेत. त्यांनी कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय तसेच भारत - बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकार्‍यांच्या लेखी परवानगीशिवाय भारतातील पश्चिम बंगाल -सिलीगुडी येथे घुसखोरी केली. तेथे त्यांनी बनावट जन्मदाखला आणि इतर कागदपत्रांद्वारे आधारकार्ड बनवले. त्यानंतर सर्वजण निगडी येथील अंकुश चौक, साईनाथनगर येथील चाळीत बेकायदेशीररित्या वास्तव्य करत होते. याठिकाणी त्यांनी आधारकार्डवरील पत्ते बदलून पुण्यातील पत्ते टाकले. बनावट कागदपत्रांचा वापर करीत तीन संशयितांनी गोवा येथून पासपोर्टही काढून घेतले. इतर दोन संशयितांचे पासपोर्ट लवकरच येणार होते. याबाबत दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यांनी छापा टाकून पाच संशयितांना पकडले. 

मोशी येथेही पकडले होते बांगलादेशी

पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मोशी येथेही मागील वर्षी दोन बांगलादेशी नागरिकांना पकडले होते. तसेच भोसरी येथे बनावट आधारकार्ड तयार करण्याचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. त्यामुळे शराहत आणखी घुसखोर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांकडून ‘सर्च ऑपरेशन’ सुरू आहे. 

पोलिसांकडून १४ बांगलादेशीवर कारवाई

निगडी, भोसरी, चिखली आणि महाळुंगे परिसरातून आतापर्यंत एकूण १४ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. त्यामध्ये सहा महिलांचा समावेश आहे. बांगलादेशी घुसखोरांमुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.