लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - वाशिम शहरानजीक असलेल्या एका शेतातील गोठ्यात अवैधरित्या ठेवलेली पाच लाख रुपये किंमतीची दारू वाशिम शहर व ग्रामीण पोलिसांनी ९ सप्टेंबरला दुपारी ३ वाजताच्या सुमारास जप्त केली.वाशिम शहरालगतच्या एका शेतशिवारातील गोठ्यात दारूचा अवैध साठा असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करण्याचे निर्देश वाशिम शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकाºयांना दिले होते. शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरिष गवळी व ग्रामीणचे ठाणेदार अजयकुमार वाढवे यांच्या नेतृत्वात घटनास्थळावर छापा टाकला असता, दत्ता लक्ष्मण मोहळे (५०) रा. शुक्रवार पेठ वाशिम यांच्या शेतातील गोठ्यात १९८ नग देशी दारूचे बॉक्स (१९८०० बॉटल) अवैधरित्या बाळगताना आढळून आले. पाच लाख १४ हजार ८०० रुपये किंमतीचा दारूचा साठा जप्त करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव यांच्यासह कर्मचारी गणेश सरनाईक, उमाकांत केदारे, गणेश बर्गे, गजानन कºहाळे, ज्ञानेश्वर मात्रे, डिगांबर वैद्य तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजयकुमार वाढवे, कर्मचारी लालमणी श्रीवास्तव, राजकुमार चौबे, केशव सरकटे, देवेंद्र कांबळे, अष्टसिद्ध नप्ते, संजय क्षीरसागर, महादेव ठाकरे, गणेश ब्रिंगल आदींनी पार पाडली.
वाशिम शिवारातील गोठ्यातून पाच लाख किंमतीची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 6:14 PM