बुधवारी सकाळी गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील कारागृहातून पाच कैदी फरार झाले. त्यापैकी चौघांवर खुनाचा आरोप होता आणि त्यांच्यावर खटला सुरू होता. ते धरंगधाराच्या जेलमध्ये बंद होते. धरंगधारा जेलचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र देवधा यांनी सांगितले की, त्यांनी बॅरेकचे कुलूप तोडून तुरुंगाची भिंतवरून चढून ते पळाले. नानजी देवीपुजक, संतू देवीपुजक, सावजी देवीपुजक आणि धरम देवपुजक या चार कैद्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची सुनावणी चालू असल्याचे त्यांनी सांगितले. तर पाचवा कैदी प्रकाश कुशवाह याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
देवधा म्हणाले की, पाच कैदी तुरुंगातील बॅरेकचे कुलूप तोडण्यात यशस्वी झाले आणि नंतर त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर उडी मारून पळ काढला. त्यांना पकडण्यासाठी आम्ही पोलिसांची पथक तयार केली आहेत. कोरोना व्हायरसमुळे जारी केलेल्या लॉकडाऊनदरम्यान गुजरातमधील ही दुसरी घटना आहे. १ मे रोजी, दाहोद जिल्ह्यातील सब-जेलमधून १३ कैदी फरार झाले. यातील नऊ जणांना नंतर अटक करण्यात आली होती, परंतु चार अद्याप फरार आहेत.
हृदयद्रावक! बेवारस पडला होता मृतदेह, चिमुकल्याचा फोटो पाहून डोळ्यात तरळतील अश्रू
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात युवक काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार