ना सुरक्षा रक्षक, ना पुजारी; मंदिरात नेमकं कुणी ओळखलं विकास दुबेला? पोलिसांनी सांगितली अशी 'थिअरी'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 03:38 PM2020-07-09T15:38:50+5:302020-07-09T16:01:29+5:30
भौपाळ - उत्तर प्रदेशातील कुख्यात आरोपी विकास दुबेला पकडण्यात उत्तर प्रदेश पोलिसांना अपयश आले. यूपी पोलिसांची वेगवेगळी पथके गेल्या ...
भौपाळ - उत्तर प्रदेशातील कुख्यात आरोपी विकास दुबेला पकडण्यात उत्तर प्रदेशपोलिसांना अपयश आले. यूपी पोलिसांची वेगवेगळी पथके गेल्या सात दिवसांपासून सात राज्यांत विकास दुबेचा शोध घेत होती. तरीही तो जाळ्यात सापडला नाही. अखेर गुरुवारी सकाळी विकास दुबेला उज्जैन येथील महाकाल मंदिरात अटक करण्यात आली. मात्र, त्याला अटक करण्यात आली, की त्याने आत्मसमर्पण केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, मध्य प्रदेश पोलिसांनी त्याला अटक केल्याचा दावा केला आहे.
कधी पुजारी, तर कधी सुरक्षा रक्षकाने ओळखले -
विकास दुबे नेमका कसा अटकेत आला, त्याला कशी अटक झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्या अटकेसंदर्भात, त्याला कधी पुजाऱ्याने ओळखले, तर कधी सुरक्षा रक्षकाने ओळखले, असे सांगण्यात येत आहे. मंदिराशी संबंधित लोकही यासंदर्भात फारसे बोलत नाहीत.
पोलिसांच्या थिअरीत फूल विकणारा-
माध्यामांनी दिलेल्या वृत्तांनुसार, उज्जैनचे डीएम आशीष सिंह यांनी म्हटले आहे, की आज सकाळी 7.30 ते 8 वाजण्याच्या सुमारास, एका संशयित व्यक्तीला महाकाल मंदिर परिसरात पाहिले गेले. त्याने दर्शनासंदर्भात सुरेश नावाच्या एका दुकानदाराकडून माहिती घेतली आणि पुजेचे सामान विकत घेतले. यावेळी त्याने तोंडाचे मास्क काढताच दुकानदाराला त्याचा संशय आला. यानंतर दुकानदाराने तत्काळ सुरक्षा रक्षकाला माहिती दिली. खासगी सुरक्षा रक्षक एका पोलिसासोबत महाकाल मंदिराच्या कॅम्पसमध्ये गेला. कॅम्पसमधेच त्याला पकडण्यात आले. त्याची विचारपूस केली असता त्याला काहीच उत्तर देता आले नाही. यानंतर त्याला महाकाल येथील चौकीवर आणण्यात आले. पुलिसांच्या जाळ्यात अडकल्याचे समजताच विकास दुबेनेच स्वतःची ओळख सांगितली.
दरबारात पाप्याला दंड -
विकास दुबेला अटक झाल्यानंतर भाजपा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे, की "बाबा महाकालच्या दरबारात पाप्याला दंड मिळाला. जय महाकाल. कुख्यात बदमाश विकास दुबेला उज्जैनच्या श्री महाकाल मंदिरातून अटक करण्यात आली. मंदिरातील सुरक्षा कर्मचारी आणि उज्जैन पोलिसांचे अभिनंदन. विकास दुबेला त्याच्या पापांची कठोर शिक्षा व्हायला हवी.
बाबा महाकाल के दरबार में पापी को आखिर मिला दंड। जय महाकाल I
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) July 9, 2020
कुख्यात बदमाश विकास दुबे को उज्जैन के श्री महाकाल मंदिर से गिरफ्तार किया गया। मंदिर के सुरक्षाकर्मियों और उज्जैन पुलिस को बधाई।
विकास दुबे को उसके किए हुए पापों की कठोरतम सज़ा मिलनी चाहिए।#VikashDubey
महत्त्वाच्या बातम्या -
चीनची धमकी - आशियातील अमेरिकेची खेळी घातक, भडकू शकतं युद्ध
चीन PAKला देतोय अत्यंत घातक शस्त्र; जाणून घ्या, कशी आहे भारताची तयारी
भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!
...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले?