शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी तिसरी अटक, फूड स्टॉल मालक ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 4:07 PM

Sharad Pawar Case : इनामदार याच्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, त्याचा शोध लागला नव्हता. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांच्याविरोधात सोशल मीडियावर (Social Media)  आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील पनवेल शहर पोलिसांनी बुधवारी रात्री एका ३४ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. पवारांविरोधात सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ही तिसरी अटक आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव किरण इनामदार (kiran Inamdar)  असून तो पनवेलमध्ये फूड स्टॉल चालवतो. त्याला गुरुवारी पनवेल न्यायालयात हजर केले असता, तेथून त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर पवारांबद्दल कथित आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ती पोस्ट इनामदार याने सोशल मीडियावर शेअर केली होती. इनामदार याच्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, त्याचा शोध लागला नव्हता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इनामदार हा अलिबागमध्ये लपला होता, तेथून पोलिसांनी त्याला बुधवारी रात्री ताब्यात घेऊन पनवेलला आणले. इनामदार यास पनवेल शहर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव केला आणि पक्षाच्या महिला सदस्यांनी तेथे धरणे सुरू केले. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कडबाने यांनी सांगितले की, आरोपी इनामदार याच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम १५३ अ (धर्म, जात, जन्मस्थान, निवासस्थान या कारणावरून विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे), ५०० (बदनामी), ५०१ (अपमानास्पद सामग्री पोस्ट करणे) आणि ५०४ (जाणूनबुजून अपमान) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तो शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे. आधी केतकी चितळे, निखिल भामरे आणि आता किरण इनामदार याला पोलिसांनी अटक केली आहे. 

टॅग्स :ArrestअटकpanvelपनवेलPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडियाSharad Pawarशरद पवारalibaugअलिबाग