नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांडात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. पोलिसांना आता १८ ऑक्टोबरचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहेत. यात पहाटे चार वाजता आफताब बॅग घेऊन जाताना दिसत आहे. पोलिसांना असा संशय आहे की, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठीच तो गेला होता. या क्लिपमध्ये दिसत आहे की, त्या रात्री त्याने तीन चकरा मारल्या होता. पोलिसांनी फ्लॅटमधील सर्व कपडे जप्त केले आहेत. यात श्रद्धाचे कपडेही आहेत. ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. पोलिसांनी सांगितले की, हत्या झाली त्या दिवशी जे कपडे परिधान केले होते ते अद्याप मिळालेले नाहीत.
आफताबविरुद्ध २०२० मध्ये तक्रार श्रद्धाचा मित्र गॉडविनची पोलिसांनी चौकशी केली. यात गॉडविनने सांगितले की, आफताबने नोव्हेंबर २०२० मध्ये श्रद्धाला मारहाण केली होती. त्यावेळी ती कॉल सेंटरमध्ये काम करीत होती. माझा भाऊही तिथे काम करत होता. श्रद्धाने बॉसला हे सांगितल्यानंतर बॉसने भावाला तिची मदत करण्यास सांगितले. त्यावर मी श्रद्धाला घेऊन नालासोपाऱ्याच्या पोलिस ठाण्यात गेलो होतो व तिथे तक्रार देण्यात आली. त्यानंतर आफताबने असे नाटक केले की, श्रद्धाने तक्रार मागे घेतली नाही तर आत्महत्या करीन. त्यानंतर श्रद्धाने तक्रार मागे घेतली.
पोलिसांना हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आफताबने पहाटेच्या सुमारास तीन वेळा चकरा मारल्याचे दिसून आले आहे. पुरावे गोळा करताना हा व्हिडीओ पोलिसांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
ॲड. उज्ज्वल निकम लढवणार श्रद्धाचा खटलायाप्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्यासाठी निर्देश दिले असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना दिली. मुंबई दौऱ्यावर असलेले बिर्ला यांची डॉ. गोऱ्हे यांनी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी केली होती. त्यावर त्यांनी त्वरित संमती देत याबाबत कार्यवाही करीत असल्याचे सांगितले होते. आरोपीला फाशीची सुनावण्याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी या निवेदनामध्ये त्यांनी केली होती.