- हितेंन नाईकपालघर :-पालघरमधील अल्पवयीन मुलींना पैसे, मोबाईलची आमिष दाखवून त्यांना शरीर विक्री व्यवसाय करायला लावणाऱ्या आणि नंतर ग्राहकांना ब्लॅकमेलिंग करणाऱ्या भाजप पदाधिकारी अपर्णा आणि तिचा पती आनंद बागुल या पालघरमधील फरार झालेल्या बंटी-बबलीचा शोध पालघर पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात शनिवारी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
पालघरमध्ये राहणाऱ्या अपर्णा बागुल आणि तिचे पती आनंद बागुल हे दोघे पती पत्नी आपल्या एका सहकारी महिलेच्या साहाय्याने गरीब असहाय्य मुलीचा शोध घेत त्यांना मोबाईल, पैसे असे नानाविध आमिषे दाखवून आपल्या जाळ्यात खेचायचे नंतर चांगले श्रीमंत सावज शोधून त्या मुलीला त्या ग्राहकासोबत शरिरीक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडायचे.
एखाद्या लॉज, रिसॉर्टवर सर्व कार्यक्रम पार पडल्यावर आनंद बागुल हे त्या हॉटेल अथवा लॉज मध्ये जाऊन मी क्राईम बॅंच विभागाचा पोलीस असल्याचे सांगून त्या मुलींशी शरीर संबंध प्रस्थापित करणाऱ्या ग्राहकांना ब्लॅकमेलिंग सुरू करायचा आणि लाखो रुपयांची मागणी करायचा. अनेक महिन्यापासून ह्या व्यवहारातून अनेक ग्राहकांना ह्या बंटी बबलीने फसविल्याचे पोलिसांकडे माहिती उपलब्ध झाली आहे.
गुजरातमध्ये राहणाऱ्या मात्र कुरिअरच्या व्यवसाया निमित्ताने पालघरमध्ये येत असलेल्या आरोपी कांजी कोठारी व्यक्तीला ह्या बंटी बबलीने हेरले. आरोपीकडे पालघर मधील एका अल्पवयीन मुलीचा ताबा देत त्याला अनैतिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले.हे क्रूरकर्म पार पाडल्यावर तुझ्यावर गुन्हा दाखल होईल असे सांगून आरोपी कडे १५ लाखाची मागणी केली.
पैसे देण्यास आपण सक्षम नसल्याचे आरोपीने सांगितल्या नंतर तडजोड होत अखेर दीड लाखावर हा व्यवहार ठरला. मात्र भाजपची पदाधिकारी असलेल्या आणि venture foundation नामक स्वयंसेवी संस्थेची सल्लागार म्हणून काम करणारी अपर्णा बागुल हिच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाल्यावर भविष्यात आपल्याला धोके असल्याची जाणीव होत. आरोपीने सरळ पालघर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी आरोपी कांजी कोठारी सह अपर्णा बागुल आणि तिचा पती आनंद बागुल ह्यांच्या विरोधात बलात्कार आणि पोक्सो कलम ४,८,१२ अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पालघर चे सपोनि संतोष जाधव करीत आहेत.