शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
3
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
4
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
6
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
7
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
8
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
9
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
10
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
11
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
12
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
13
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
14
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
15
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला
16
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने एक सामना जिंकला तर...", अक्रमने आपल्याच संघाची लाज काढली
17
मल्लिकार्जुन खरगेंनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले,मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण काय?
18
ऐन सणासुदीच्या-निवडणुकीच्या काळात मावळ हादरले! पवन मावळातील ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या
19
Maharashtra Election 2024: दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे; दुभंगलेल्या शिवसेनेचे अस्तित्व पणाला
20
Washington Sundar वर का आली सहकाऱ्यांची जर्सी घालून खेळण्याची वेळ? जाणून घ्या त्यामागचं कारण

ख्रिसमस, थर्टी फर्स्टसाठी आणलेली १ कोटींची विदेशी दारू जप्त; उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2023 1:37 PM

कारवाई करून उत्पादन शुल्क विभागाने सदर गुन्ह्यात नरेश रवानी, जीशान कुरेशी आणि प्रेमजी गाला  या तीन आरोपींवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.

श्रीकांत जाधव 

मुंबई - ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टसाठी खास कुरियरने मागवलेल्या विदेशी मद्याचा १ कोटी किंमतीचा साठा राज्य उत्पादन शुल्क, मुंबई शहर भरारी पथक दोन यांनी केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. तसेच तीन आरोपींवर गुन्हा नोंदविण्यात आला असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले टेम्पो आणि कंटेनर सुद्धा जप्त करण्यात आले आहेत. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहर भरारी पथक दोनचे निरीक्षक प्रकाश काळे यांच्या नेतृत्वाखाली दाणा आणि वाडीबंदर येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत हरियाणा राज्यात विक्री केल्या जाणाऱ्या विदेशी मद्याच्या ५८० ब्रँड व्हिस्की बॉटल कुरिअरच्या माध्यमातून अवैद्य वाहतूक करून मुंबईत आणण्यात आल्याची खबर मुंबई शहर भरारी पथक दोनला मिळाली होती.

त्यानुसार कारवाई करून उत्पादन शुल्क विभागाने सदर गुन्ह्यात नरेश रवानी, जीशान कुरेशी आणि प्रेमजी गाला  या तीन आरोपींवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे एक कंटेनर आणि टेम्पो असे वाहन सापडले असून १७ नामवंत विदेशी ब्रँड कंपनीच्या ५८० सीलबंद बाटल्या सापडल्या आहेत. या सर्व कारवाईत १ कोटी १ लाख ६३ हजार ९३५ कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाई पथकामध्ये निरीक्षक प्रकाश गौडा, संतोष चोपडेकर, संदीप मोरे, दुय्यम निरीक्षक प्रताप खरबे, रफिक शेख जवान विनोद अहिरे सचिन पैठणकर प्रथम रावराणे विकास सावंत आणि सानप दिनेश खैरनार  सहभागी झाले होते.