मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) रविवारी रात्री मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका परदेशी नागरिकाला पकडून सात कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले. त्याने पोटात व शरीराच्या काही भागात लपवून ते आणले होते, मात्र वैद्यकीय तपासणी करून ते बाहेर काढण्यात आल्याचे समजते. त्याबाबत तपास करण्यात येत असून अधिक भाष्य करण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.एनसीबीच्या मुंबई पथकाला मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री विमानतळावर पाळत ठेवण्यात आली होती. संशयास्पद हालचालीमुळे या परदेशी नागरिकाला ताब्यात घेऊन ही कारवाई करण्यात आली. त्याची चौकशी करण्यात येत आहे.पोटात लपवून केली तस्करी त्याने पोटात व शरीराच्या काही भागात लपवून ड्रग्ज आणले होते, मात्र वैद्यकीय तपासणी करून ते बाहेर काढण्यात आल्याचे समजते. त्याच्या पोटात एक कोटीचे ड्रग्ज असावे, असा अधिकाऱ्यांना कयास होता, वैद्यकीय तपासणी केली असता त्याच्या पोटातून ७ कोटीचे मादक पदार्थ आढळून आल्याचे समजते.
'तो' चक्क पोटातून ७ कोटींचे ड्रग्ज घेऊन परदेशातून आला; एनसीबीच्या ताब्यात 'असा' सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 7:54 AM