भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड महेश मोहिते सर्व आरोपांतून दोषमुक्त

By राजेश भोस्तेकर | Published: July 27, 2023 09:36 PM2023-07-27T21:36:20+5:302023-07-27T21:36:45+5:30

उच्च न्यायालयाने दोषारोप केले रद्द, महेश मोहितेंना दिलासा

Former BJP District President Adv Mahesh Mohite acquitted of all charges | भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड महेश मोहिते सर्व आरोपांतून दोषमुक्त

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड महेश मोहिते सर्व आरोपांतून दोषमुक्त

googlenewsNext

राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: रायगडचे भाजपचे माजी जिल्हाअध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्यावरील सर्व दोषारोप उच्च्य न्यायालयाने रद्द केले आहेत. या निर्णयामुळे अ‍ॅड. मोहीते यांना दिलासा मिळाला आहे. एका महिलेने त्यांच्यावर शोषणाचे आरोप केले होते. यांनतर विरोधकांंनी त्याचे मोठे राजकारण झाले होते.
 
अ‍ॅड. मोहिते यांचे हे प्रकरण मुंबई उच्च्य न्यायालयात सुरु होते. उच्च्य न्यायालयाचे न्या. गडकरी आणि न्या. दिघे यांच्या खंडपिठाने अ‍ॅड. मोहिते यांच्यावरील सर्व दोषारोप रद्द केले आहेत. अ‍ॅड महेश मोहिते यांची राजकिय कारकिर्द बहरत असताना, एका महिलेने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मोहिते याचे पहिले लग्न झाले असताना २०१५ साली माझ्याशी खोटे बोलून विवाह केला असल्याची तक्रार महिलेने सोलापूर येथे पोलीस ठाण्यात केली होती. तसेच तक्रारदार महिलेने राज्य महिला आयोगाकडेही याबाबत तक्रार केली आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात पक्षावर टीकेची झोड उठत आहे. यामुळे वरिष्ठांनी मोहिते याची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करून राजीनामा घेतला आहे. मोहिते यांच्या या प्रकरणामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
 
महिलेने केलेल्या आरोपामुळे महेश मोहिते यांच्या आक्रमक राजकीय वाटचालीला ब्रेक लागला होता. मात्र सामाजिक कार्य सुरुच होते. मुरूड आणि रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या बल्क ड्रग पार्क विरोधात मोहिते यांचा लढा सुरुच ठेवला.
 
अ‍ॅड. मोहिते यांनी शेतकर्‍याचा आवाज राज्य सरकार, राज्यपाल ते अगदी थेट दिल्लीपर्यंत पोहचविला होता. पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुन्हा एकदा पक्षाच्या राज्य पातळीवरील संघटनात्मक जबाबदारी सोपवून विश्वास व्यक्त केला. आता न्यायालयानेही त्यांच्यावरील दोषारोप रद्द केले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आलेले बालंट देखील आता दूर झाले आहे. अ‍ॅड. मोहिते यांच्यावरील दोषारोप उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे मोहिते समर्थकांनी समाधान व्यक्त केला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने ऍड महेश मोहिते यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Former BJP District President Adv Mahesh Mohite acquitted of all charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.