शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
2
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
5
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
6
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
7
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
8
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
9
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
10
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
11
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
12
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
13
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
14
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
17
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
18
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
20
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?

Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना दणका; CBI नं केला गुन्हा नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2022 11:36 AM

Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey hit; The CBI recorded the offense: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना दणका ३० जूनला संजय पांडे सेवानिवृत्त झाल्यानंतर ईडीनेही त्यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावलं होते. आता सीबीआयनं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई - सीबीआयनं मुंबई पोलीसचे माजी आयुक्त संजय पांडे आणि एनएसईच्या सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्यावर बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी संजय पांडे यांच्यावर घरावरही छापा टाकला आहे. १९८६ बॅचमधील आयपीएस अधिकारी संजय पांडे यांचा मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता. 

३० जूनला संजय पांडे सेवानिवृत्त झाल्यानंतर ईडीनेही त्यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावलं होते. आता सीबीआयनं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संजय पांडे आणि चित्रा रामकृष्ण यांनी एक ऑडिट कंपनी स्थापन केली होती. २०१८ पासून सीबीआय एनएसई स्कॅमचा तपास करत आहे. २००९ ते २०१७ या काळात शेअर मार्केटमधील कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याप्रकरणी सीबीआयनं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

 

काय आहे प्रकरण?मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नोटीस बजावल्याने पोलीस दल आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. पांडे यांची मंगळवारी दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली. संजय पांडे हे ३० जूनरोजी निवृत्त झाल्यानंतर त्यांना ईडीच्या चौकशीला तोंड द्यावे लागले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय पांडे यांनी २००१ मध्ये एक आयटी ऑडिट कंपनी सुरू केली होती. त्यादरम्यान पांडे यांनी दिलेला राजीनामा न स्वीकारल्याने ते पुन्हा पोलीस दलात रुजू झाले. संबंधित कंपनीत मुलगा आणि आईला त्यांनी संचालकपदी नेमले. २०१० आणि २०१५ च्या दरम्यान पांडे यांच्या या कंपनीला एनएसई सर्व्हर आणि सिस्टम्सचे आयटी ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. दरम्यान सीबीआयने नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) घोटाळ्यात २०१८ मध्ये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याच गुन्ह्याच्या आधारे ईडीदेखील याप्रकरणी चौकशी करत आहे. त्यामुळे येत्या काळात पांडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, सीबीआयनंही आता त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानं संजय पांडेच्या अडचणी वाढणार आहेत.  

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग