जळगाव - एका शिक्षकाचा मोबाइल अमळनेर येथील ६८ वर्षीय माजी सैनिकाने चोरला आणि शिरपूर (धुळे) येथे शिकणाऱ्या नातवाला दिला. नातवाने तो प्रेयसीला भेट दिला. त्यामुळे दारात थेट पोलीस धडकल्याने भांबावलेल्या प्रेयसीने प्रियकराची खरडपट्टी काढत, मोबाइलचोर वृद्धाला पकडून दिले. मात्र हा मोबाइल आपण वापरत नाही. तो वापरणाºयांवर कारवाई करा, असा पवित्रा वृद्धाने घेतला.अमळनेर येथील एका खासगी रुग्णालयात एक शिक्षक दाखल होते. तेथे हा वृद्ध सैनिक कामानिमित्त आला होता. शिक्षकाला वरच्या मजल्यावरून तळमजल्यावर आणत असताना मदत करण्याच्या बहाण्याने त्याने ११ हजार रुपये किमतीचा त्यांचा मोबाइल चोरला. शिक्षकाने अमळनेर पोलीस स्टेशनला याबाबत ८ जून रोजी तक्रार दिली. लोकेशन शोधले असता हा मोबाइल शिरपूर येथे असल्याचे निष्पन्न झाले.या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका महाविद्यालयातील तरुणीला ताब्यात घेतले. तिच्याजवळील मोबाइल चोरीचा असल्याचे सांगितले. या वेळी तिचा प्रियकरही तेथे उपस्थित होता. त्यामुळे संतापलेल्या प्रेयसीने प्रियकरांची खरडपट्टी काढली. विशेष म्हणजे प्रियकरही याबाबत अनभिज्ञ होता. त्याला आजोबांकडून हा मोबाइल मिळल्याचे कळताच पोलीस अमळनेरात आजोबांकडे गेले.
माजी सैनिकाने चोरला मोबाइल, नातवाने दिला प्रेयसीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2018 5:10 AM