दिवंगत माजी केंद्रीय मंत्री पी रंगराजन कुमारमंगलम (P Rangarajan Kumaramangalam) यांची पत्नी किट्टी कुमारमंगलम (Kitty Kumaramangalam) यांची काल रात्री वसंत विहारमधील त्यांच्या घरी हत्या (Murder) करण्यात आली. या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. दोन अन्य व्यक्तींचा शोध सुरु आहे. (Former union minister Rangarajan Kumaramangalam’s wife murdered at delhi's home.)
दिल्ली पोलिसांनुसार ६७ वर्षांच्या किट्टी कुमारमंगलम यांच्या घरी चोरी करण्याच्या उद्देशाने घुसलेल्या आरोपींनी त्यांची हत्या केली. त्या दुसऱ्या मजल्यावर राहत होत्या. रंगराजन हे अटल बिहारी सरकारमध्ये मंत्री होते. त्यांचे कॅन्सरमुळे निधन झाले होते.
मंगळवारी रात्री ९ वाजता किट्टी कुमारमंगलम यांच्यासोबत त्यांची मोलकरीन होती. तिने सांगितले की, मंगळवारी रात्री धोबी आला, त्याने दरवाजा उघडला आणि तिला पकडून ओढत शेजारच्या खोलीत घेऊन गेला आणि बांधले. तेव्हा दोन तरुण घरात घुसले आणि उशीने किट्टी यांचे तोंड दाबले आणि हत्या केली.
पोलिसांनी सांगितले की, रात्री ११ वाजता याची माहिती मिळाली. जेव्हा मोलकरणीने स्वत:ला सोडवून घेतले आणि आरडाओरडा केला. मोलकरणीनुसार तिला ज्या धोब्याने बांधले त्याचे नाव राजू आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. राजूचे वय २४ वर्षे आहे. तो वसंत विहारच्याच भंवर कॅम्पमध्ये राहतो. हत्या करणाऱ्या अन्य दोन आरोपींचीदेखील ओळख पटली आहे. त्यांचा शोध सुरु आहे.