भिवंडी - तालुक्यात कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या 56 ग्रामपंचतीच्या कार्यक्षेत्रात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून तळवली - अर्जुनली ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच पूनम वाघे यांचे पती श्याम शांताराम वाघे व त्यांचा मित्र जगदीश राऊत यांच्यावर विरोधी पॅनल गटाने चार अज्ञात हल्लेखोरांमार्फत तलवार, लोखंडी रॉड व लाठ्याकाठ्यांनी हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना भादाणे येथील नाईक फाउंडेशन लगतच्या कार्यालयासमोर मंगळवारी घडली आहे. सुदैवाने या हल्ल्यात सरपंच महिलेच्या पतीचा जीव वाचला आहे. या हल्ल्यात सरपंच महिलेचे पती श्याम वाघे व त्यांचा मित्र जगदीश हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
या घटनेचे अधिक वृत्त असे की जखमी श्याम वाघे यांची पत्नी पूनम वाघे हि मागील पाच वर्षांपासून सरपंच पदावर कार्यरत आहे. या दरम्यान ग्रामपंचायत सदस्य महेश राऊत हे परस्पर विविध विकास कामांच्या कागदपत्रांवर सरपंच पूनम वाघे यांच्या सह्या घेऊन जात होते.त्याबाबत विचारणा केली असता काहीएक बोलत नव्हता त्यामुळे सरपंच महिलेचे पती श्याम वाघे यांनी काही दिवसांपूर्वी महेश यास जाब विचारून मी घरात नसताना तू माझ्या पत्नीच्या परस्पर सह्या घेऊन का जात आहे.यावरून चिडून महेश याने अर्वाच्च भाषेत बोलून तुला बघून घेतो अशी धमकी दिली.या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. काल रात्री श्याम वाघे हे मित्र जगदीश याच्या कार्यालयातून घरी जाण्यासाठी बाहेर निघाले असता अचानक चार हल्लेखोरांनी तोंडाला मास्क व अंगात कोट घालून मोटार सायकलींवरून येऊन श्याम व जगदीश या दोघांवर लोखंडी रॉड, तलवार व लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. सदरचा हल्ला महेश राऊत याने कट रचून घडवून आणला आहे असे पोलिस ठाण्यात श्याम वाघे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्राणघातक हल्याप्रकरणी पडघा पोलिस ठाण्यात चार अज्ञातांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस हवालदार कृष्णा काटकर करीत आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबावर दबाव; वकीलाने लावला गंभीर आरोप
सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, व्हॉट्स अॅप आणि सोशल मीडियाच्या मदतीने सुरु होती देहविक्री
खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार
Coronavirus News : सांगलीतील इंदिरानगर येथील कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त
'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत
निर्दयी बापाने अडीज वर्षात पाच पोटच्या मुलांची केली हत्या, कारण ऐकून लोकांना बसला धक्का