शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

11 वर्षाच्या मुलीच्या कौमार्याचा चाळीस हजारांत सौदा; मैत्रिणीच्या मुलीवरच टाकला फास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2021 2:28 PM

Crime News : गुन्हे शाखेची कारवाई, तीन महिला गजाआड

ठळक मुद्देअर्चना शेखर वैंशपायन (वय ३९, रा. खरबी), रंजना चतुर्भुज मेश्राम (वय ४५, गोधनी) आणि कविता पुरुषोत्तम निखारे (वय ३०, रा. बांगलादेश, नाईक तलाव) अशी या महिलांची नावे आहेत.आरोपींच्या तावडीतून मुलीची सुटका केल्यानंतर अर्चना वैशंपायन, रंजना मेश्राम आणि कविता निखारे या तिघींना पोलिसांनी ताब्यात घेतले. कोराडी पोलीस ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

नागपूर : ११ वर्षांच्या मुलीच्या कौमार्याचा ४० हजारात सौदा करून तिला प्रौढ ग्राहकाच्या हवाली करणाऱ्या तीन महिलांना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. अर्चना शेखर वैंशपायन (वय ३९, रा. खरबी), रंजना चतुर्भुज मेश्राम (वय ४५, गोधनी) आणि कविता पुरुषोत्तम निखारे (वय ३०, रा. बांगलादेश, नाईक तलाव) अशी या महिलांची नावे आहेत.

अर्चना या टोळीची सूत्रधार आहे. तिने तिच्या मैत्रिणीच्या अकरा वर्षीय मुलीला काही दिवसांपूर्वी बर्थ डे पार्टीत जायचे आहे, म्हणून सोबत नेले. मुलीला फूस लावून "वेश्याव्यवसायात खूप रक्कम मिळते", असे सांगून तिने शरीर विक्रय करण्यास मुलीस बाध्य केले. त्यानंतर तिला रंजनाच्या कोराडी मार्गावरील ओम नगरात असलेल्या सदनिकेत नेले. तिथे कविता तिच्यासाठी ग्राहक शोधू लागली. अकरा वर्षाच्या मुलीचे कौमार्य विकायचे आहे, मुलगी खूप सुंदर आहे, असे सांगून कविता आणि तिच्या साथीदारांनी अनेक आंबटशौकिनांशी संपर्क केला. ही माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने बनावट गग्राहकाच्या माध्यमातून आरोपी महिलांशी संपर्क साधला चाळीस हजारात मुलीच्या कौमार्याचा सौदा ठरल्यानंतर पोलिसांनी तयार केलेला हा बनावट ग्राहक गुरुवारी रंजनाच्या सदनिकेत पोहोचला. त्याच्याकडून रक्कम घेतल्यानंतर महिलेने शरीरसंबंधासाठी त्या व्यक्तीच्या हवाली अकरा वर्षीय मुलीला केले. बाजूच्या रूममध्ये मुलीला घेऊन गेल्यानंतर आजूबाजूलाच घुटमळत असलेल्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने तेथे छापा घातला. आरोपींच्या तावडीतून मुलीची सुटका केल्यानंतर अर्चना वैशंपायन, रंजना मेश्राम आणि कविता निखारे या तिघींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध कोराडी पोलीस ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अनेक मुलींचे जीवन उध्वस्त या टोळीची सूत्रधार अर्चना अनेक वर्षांपासून या गोरख धंद्यात सक्रिय आहे. ती आधी कुंटनखाना चालवायची. ती आणि तिच्या महिला साथीदारांनी अनेक मुलींचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. पैशाचे आमिष दाखवून त्यांनी अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ओढले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरPoliceपोलिसWomenमहिलाArrestअटकProstitutionवेश्याव्यवसाय