अहमदाबाद : मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील चार आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. याआधी २३ मे रोजी सीबीआयने त्यांना न्यायालयात हजर केले, त्यानंतर आरोपींना सात दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांनतर ती सीबीआय कोठडी संपल्यानंतर आज कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अबू बकर, युसूफ भक्त, शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी अशी आरोपींची नावे आहेत.
या चारही आरोपींना गुजरात एटीएसने अटक केली होती. त्यानंतर सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले होते. या चार आरोपींना सीबीआयने न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी या सर्व आरोपींना सा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत आज संपत असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.