चंद्रपूर - चंद्रपूर महानगरातील श्यामनगर, पागलबाबानगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरींच्या अफवांनी नागरिक हैराण असून त्यांच्यात दहशतीचे वातावरण आहे. यामुळे रात्रीला डोळ्यात अंजन घालून जागत आहे. अशातच संतप्त नागरिकांनी एका युवकाला चोर समजून बेदम मारहाण केली. यात त्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
19 डिसेंबरला रात्रीचे 8.30 ते 9 दरम्यान 2 युवक पागलबाबा परिसरात मित्राचं घर शोधत आले, हे दोन्ही युवक तुकुम परिसरातील होते, पंकज लांडगे व अविनाश कल्लो असे या दोन मित्रांचे नाव, पागलबाबा परिसरात मित्राचं घर शोधण्यासाठी त्यांनी एका घरी विचारणा केली तर त्या घरी एक महिला दोघांना बघताच आरडाओरडा करू लागली व आपल्या परिसरात चोर आले म्हणून नागरिकांना बोलवू लागली, अचानक घडलेल्या या घटनेने दोन्ही युवक घाबरले व ते पळायला लागले, परिसरातील काही नागरिक लाठ्या काठ्या घेऊन त्या युवकांच्या मागे होती.
दोन्ही युवकांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले व त्या परिसरातील एका झाडाला दोघांना बांधले व बेदम मारहाण सुरू केली, युवक वारंवार नागरिकांना विनवण्या करू लागले आम्ही चोर नाही, मित्राचं घर शोधण्यासाठी आलो परंतु नागरिकांनी त्यांचं काही न ऐकता त्यांना मारहाण सुरू ठेवली या मारहाणीत पंकज लांडगे या युवकाचा मृत्यू झाला.
पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी अष्टभुजा परिसर गाठत युवकांना बाहेर काढले परंतु तोपर्यंत पंकज चा मृत्यू झाला होता, अविनाश हा गंभीर जखमी झाला.
परिसरात जेव्हा या प्रकारच्या अफवा उडत होत्या तर पोलिसांनी त्या जागी गष्त वाढवायला हवी होती, फक्त मित्राच्या घरचा पत्ता विचारता विचारता त्याला तेथील नागरिकांनी पंकज ला यमसदनी पाठवले, या प्रकरणात रामनगर पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे, घटनेनंतर खुद्द जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी जाऊन पूर्ण माहिती घेतली.
शहरातील अष्टभुजा, इंदिरानगर, शामनगर, बंगाली कॅम्प परिसरात काही महिन्यांपासून चोरांची चांगलीच दहशत सुरू आहे, चोर परिसरात येऊन आवाज देऊन बाहेर बोलावतात व घरात शिरून चोरी करतात अशी चर्चा खूप दिवसांपासून या परिसरात सुरू आहे, पोलिसांनी याबाबत माहिती मिळविली असता ही निव्वळ अफवा आहे अशी कोणतीही घटना या परिसरात घडलेली नाही.
नागरिकांनी अश्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सुद्धा केले आहे, परंतु या अफवेने कुणी नवीन व्यक्ती या परिसरात गेले तर काय होणार असा प्रश्न पोलिसांसमोर आहे, नवीन व्यक्ती गेला काही बरं वाईट झालं तर? अशीच घटना काल अष्टभुजा परिसरातील पागलबाबा नगर येथे घडली.