शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नेरूळमधील विकासकाच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक, गुजरात कनेक्शनचा तपास

By सूर्यकांत वाघमारे | Published: March 20, 2023 9:33 PM

सततच्या त्रासाला कंटाळून दिली हत्येची सुपारी

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: नेरुळ येथे घडलेल्या विकासकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. गुजरातमधील साई या गावात विकासकाची असलेली दहशत मोडीत काढण्याच्या उद्देशाने व त्याने केलेल्या पूर्वीच्या हत्येचा बदल घेण्याच्या उद्देशाने हत्येची सुपारी देण्यात आली होती. त्यानुसार मारेकरुंना अटक केल्यानंतर मुख्य सूत्रधाराच्या शोधात पोलिस आहेत.

विकासक सवजी मंजेरी (५६) यांची बुधवारी नेरुळ येथे गोळ्या झाडून हत्या झाली होती. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हे शाखा व परिमंडळ पोलिसांची १० हुन अधिक पथके तयार करण्यात आली होती. त्यानुसार गुन्ह्याचा तपास करत असताना नेरुळ पोलिसांना घटनास्थळापासून सुमारे ७०० मीटर अंतरावर संशयित मोटरसायकल आढळून आली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा करत चौघांना अटक केली आहे. मेहेक, नारिया (२८), कौशल यादव (१८), गौरवकुमार यादव (२४) व सोनूकुमार यादव (२३) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मेहेक हा मूळचा गुजरातचा असून गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल त्याने ओएलएक्स वरून खरेदी करून दिली होती. त्या मोटारसायकलवरून कौशल व सोनूकुमार याने सवजी यांच्यावर पाळत घेऊन घटनेच्या दिवशी कौशल याने सवजी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर काही अंतरावर मोटरसायकल सोडून वाशीला व तिथून रेल्वेने पनवेलला गेल्यानंतर तिथून त्यांनी बिहार गाठले होते. दरम्यान संशयित मोटरसायकल हाती लागल्यानंतर पोलिसांना तपासाचा धागा मिळाला होता. त्याद्वारे उपायुक्त विवेक पानसरे, सहायक आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत, रवींद्र दौंडकर, निरीक्षक महेश पाटील, सहायक निरीक्षक सचिन ढगे, सत्यवान बिले आदींच्या पथकाने हा संपूर्ण गुन्हा उघडकीस आणला आहे.

गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल अनेकांना विकली गेली होती. रातोरात त्या सर्वांची माहिती काढून पथक मेहेक नारिया त्याच्यापर्यंत पोहचले होते. त्यानुसार १८ तारखेला गुजरात मध्ये धडकल्या पथकाने मेहेक याला ताब्यात घेतल्यानंतर तिघा मारेकरुंची माहिती समोर आली. त्यानुसार दुसऱ्या पथकाने तात्काळ बिहार गाठून कौशल, गौरवकुमार व सोनूकुमार यांना ताब्यात घेतले असून दोन दिवसात त्यांना नवी मुंबईला आणले जाणार असल्याचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी सह आयुक्त संजय मोहिते, उपायुक्त विवेक पानसरे, उपायुक्त अमित काळे, सहायक आयुक्त गजानन राठोड व इतर अधिकारी उपस्थित होते. तपास पथकाने अत्यंत कौशल्यपूर्णरित्या तपास करून गुन्हा उघडकीस आणला आहे.

मोटरसायकल ठरली सुगावा

गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल खरेदी केल्यानंतर तिची नंबरप्लेट अस्पष्ट करण्यात आली होती. शिवाय चेसिस नंबर देखील मिटवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र पोलिसांनी कौशल्य पणाला लावून मोटरसायकलच्या शेवटच्या खरेदीदाराची माहिती मिळवून तपासाचा धागा पकडला.

२५ लाखाची दिली सुपारी

मयत सवजी यांची गुजरातच्या रापर तालुक्यातील साई या गावी प्रचंड दहशत होती. त्यांच्यावर १९९८ मध्ये बच्चूभाई पटनी यांच्या हत्येचा देखील गुन्हा आहे. मात्र या गुन्ह्यात निर्दोष सुटल्यानंतर सवजी यांनी इतरांवर धाक जमवायला सुरवात केली होती. त्यातून गावी त्यांचे अनेकदा वाद देखील झाले आहेत. तीन महिन्यांपूर्वी पटनी यांच्याच काही नातेवाईकांसोबत त्यांचा वाद देखील झाला होता. यामुळे सवजी हा आपला सूड घेणार याच्या भीतीने संबंधितांनी त्यांच्या हत्येची २५ लाखाची सुपारी दिली होती. त्यापैकी एक लाख रुपये त्यांना देण्यात आले होते.

हत्येचा दोनदा प्रयत्न फसला

मारेकरूनी अहमदाबाद व इतर ठिकाणी दोनदा सवजी यांच्या हत्येचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना पिस्तूल, चाकू देखील पुरवण्यात आले होते. मात्र प्रयत्न यशस्वी न झाल्याने १० मार्चला त्यांनी नवी मुंबईत येऊन त्यांच्यावर पाळत ठेवण्यास सुरवात केली होती. अखेर १५ मार्चला नेरूळमध्ये संधी मिळताच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 

हत्येनंतर मंदिरात घातला अभिषेक

बुधवारी संध्याकाळी सवजी यांची नेरूळमध्ये हत्या झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावातील विरोधकांनी तिथल्या मंदिरात अभिषेक घातला होता. हा प्रकार तिथल्या नागरिकांच्या निदर्शनास आला असता त्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना देखील मिळाली. दरम्यान हत्येच्या कटाचा मुख्य सूत्रधार कोण हे मारेकरुंकडून उघड करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई