ठाणे : भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या जनआर्शिवाद सहभागी झालेल्यांचे पाकीट मारणाऱ्या चार जणांच्या टोळकीला ठाणो पोलिसांनी अखेर अटक केली आहे. हे चारही आरोपी मालेगाव येथील रहिवासी असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. हे चारही आरोपी या यात्रेत कार्यकर्ते म्हणून सहभागी झाले असल्याची माहिती देखील तपासात समोर आली आहे.
ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अबुबक्र अन्सारी (३५), नदीत अन्सारी (३०), आतिक अहमद (५१) आणि अश्याक अन्सारी (३८) यांना अटक केली आहे. अशी त्यांच्याकडून चोरलेली १ लाख १९ हजार रु पयांची रोकड, १० मोबाईल फोन जप्त केली आहेत. चौघेही आरोपी मालेगाव येथील रहिवासी असून खास जनआशिर्वाद यात्रेत खिसेकापण्यासाठी त्यांनी मालेगाव ते ठाणे असा प्रवास केला होता. सोमवारी ठाणे शहरात भाजपच्या वतीने जनआर्शिवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्नेमध्ये भाजपचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.
याच संधीचा फायदा घेत अबुबक्र, नदीत, आतिक आणि अश्याक हे चौघेही कार्यकर्ते बनून यात्रेत सहभागी झाले. यात्नेची सुरूवात कोपरी येथील आनंदनगर येथे झाली होती. याठिकाणी रस्त्याकडेला एका मंडपही बांधण्यात आला होता. कपिल पाटील या मंडपाच्या येथे आले असता कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला. चौघा चोरट्यांनी गर्दीत कोणाला संशय येऊ नये म्हणून भाजपचे चिन्ह असलेल्या मास्कचा वापर केला. सुरूवातीला या चौघांनी एका नेत्याचे खासगी स्वीय सहाय्यक यांच्या खिशातील एक लाख रुपये गायब केले. त्यानंतर यात्रेमध्ये चालताना एका पत्रकाराचे १५ हजार रुपये तसेच भाजपचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या खिशातील रोकड, मोबाईल चोरी केले. या घटनेप्रकरणी संबंधित पत्रकार आणि स्वीय साहाय्यकाच्या मदतनीसाने कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणाचा समांतर तपास ठाणो गुन्हे अन्वेषण शाखा युनीट पाचकडून सुरू होता.
युनीट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने यात्नेमध्ये काढण्यात आलेले मोबाईल चित्रीकरण तपासले. तसेच संशयित दिसणाऱ्यांची छायाचित्न गोळा केली. संशियतांची छायाचित्ने खबऱ्यांना पाठविण्यात आले. त्यावेळी छायाचित्नांतील चार जण हे मालेगावमधील रहिवासी असून ते सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पथकाने चोरट्यांचे मोबाईल क्रमांक मिळविले. त्यांच्या मोबाईलचे स्थळ तपासले असता ते शिळफाटा येथील एका हॉटेलमध्ये दाखिवत होते. त्यानंतर पोलिसांनी शिळफाटा येथील हॉटेलमधून चारही चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे १ लाख १८ हजार रुपयांची रोकड, १० मोबाईल फोन आढळून आले. याप्रकरणी चारही जणांना अटक करण्यात आल्याची माहिती विकास घोडके यांनी दिली.