Honey Trap : उत्तराखंडच्या उधम सिंह नगरमध्ये एका शिक्षकाला आपल्या फेसबुक फ्रेंडचा वाढदिवस साजरा करणं महागात पडलं. हा शिक्षक एका प्लानचा शिकार झाला होता. वाढदिवसाच्या बहाण्याने शिक्षक Honey Trap चा शिकार झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी दाम्पत्यासहीत 4 आरोपींना अटकक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उधम सिंह नगरच्या काशीपुरामध्ये राहणाऱ्या शिक्षकाने पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून याची माहिती दिली की, फेसबुकच्या माध्यमातून त्याची एका तरूणीसोबत ओळख झाली होती. त्यानंतर त्यांची जवळीक वाढली. गेल्या 21 एप्रिलला फेसबुक फ्रेंडने बोलवल्यानंतर तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जसपूर खुर्द येथील रुद्राक्ष गार्डन नावाच्या हॉटेलमध्ये पोहोचला.
शिक्षकाने सांगितलं की, रुद्राक्ष गार्डनमध्ये पोहोचल्यानंतर फेसबुकवरील महिला फ्रेंड त्याला एका रूममध्ये घेऊन गेली आणि यादरम्यान प्लानिंगनुसार तिचे साथीदार अचानक रूममध्ये आले. त्यांनी दोघांचे आक्षेपार्ह स्थितीत व्हिडीओ काढले आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन 2 लाख रूपयांची मागणी केली. महिलेच्या साथीदारांनी मारहाणही केली.
यानंतर पीडित शिक्षकाने आपल्या ओळखीच्या व्यक्तीला तिथे बोलवून 30 हजार रूपये रोख आणि 10 हजार रूपये ऑनलाइन दिले होते. तसेच महिला आणि तिच्या साथीदारांनी त्याची स्कूटी, क्रेडीट कार्ड आणि मोबाइलही घेतला. पोलिसांनी शिक्षकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
एसएसपी उधम सिंह नगर डॉ. मंजूनाथ टीसी यांनी सांगितलं की, पोलिसांनी खबऱ्याच्या सूचनेवर दाम्पत्यासहीत 4 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी चौघांकडूनही पीडित शिक्षकाची स्कूटी, मोबाइल, क्रेडीट कार्ड आणि 20 हजार रूपये ताब्यात घेतले.