शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

युवकाने आई वडिलांसह घरातील चौघांना कायमच संपवलं; पत्नीने केला खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 10:58 PM

पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे

बांदा - यूपीच्या जनपद बांदा येथे एका गावात शनिवारी रात्री एकाच कुटुंबातील ४ जणांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली. एखाद्या लुटीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा बनाव रचण्यात आला. परंतु तपासात कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले. या प्रकरणी मृताच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर पकडलेल्या आरोपीच्या पत्नीने पतीच खूनी असल्याचा दावा केला. 

पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी म्हणाले की, बालेंद्रचा वडील चुन्नूसोबत अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. हा वाद पत्नीवरून झाला होता. यामुळे पत्नी सुनीता माहेरी निघून गेली. कौटुंबिक वादातून बालेंद्रने कुटुंबातील चौघांची हत्या केली. त्यात आई वडील, वहिनी आणि मुलाला आरोपीने मारून टाकले. 

युवकाला करायचं होतं दुसरं लग्नघटनेनंतर ८ वर्षीय मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून आई सुनीता हॉस्पिटलला पोहचली, ती म्हणाली की, माझ्या नवऱ्यानेच आई वडील आणि मुलाला मारले आहे. जर मी घरात असते तर माझीही हत्या केली असती. याआधीही अनेकदा त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला आहे. मी घाबरून माहेरी राहायला गेले. नवऱ्याला दुसरं लग्न करायचे होते. मात्र त्याच्या लग्नाच्या आड सर्व लोक येत होते. त्यामुळे कुटुंबातील सर्वांना संपवून त्याने दुसऱ्या लग्नाचा मार्ग मोकळा केला. सासरे पतीला जमीन देत नव्हते त्यामुळे दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता असा आरोप युवकाच्या पत्नीने केला.