जळगाव: येथील दुय्यम कारागृहात सुनील भागवत (४०, रा, चांगदेव ता.मुक्ताईनगर ) या आरोपीस कारागृहात मारहाण करण्यात आली होती. यात त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी कारागृह अधीक्षक नागनाथ महादेव भानोसे यांच्यासह तुरुंग रक्षक तथा हवलदार सुभाष बाबुराव खरे , भानुदास निवृत्ती पोटे, सिताराम विठ्ठल कदम व अनिल श्रीराम बडगुजर पाच जणांवर वर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाणीची घटना ४ मार्च २०२० रोजी घडली होती. मंगळवारी रात्री हा गुन्हा दाखल झाला. डी .वाय . एस . पी. सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन पडगम तपास करीत आहे.