मुंबई: फेब्रुवारी २०२१ मध्ये दाखल करण्यात आलेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणात आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील तीन आरोपींनी वेब सीरिजच्या शुटिंगदरम्यान एका अभिनेत्रीवर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून, क्राईम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलने ही कारवाई केली.
पोलिसांनी नरेश रामावतार पाल (२९), सलीम सय्यद (३२), अब्दुल सय्यद (२४), अमन बर्नवाल (२२) यांच्यासह चार फरार आरोपींना अटक केली. वेब सीरिजच्या शुटिंगसाठी आरोपींना प्रत्येकी दोन हजार रुपये दिले होते. पाल हा कास्टिंग डायरेक्टर आहे. पॉर्न फिल्मच्या शुटिंगसाठी त्याने अभिनेत्याला जबरदस्तीने मढ येथील एका बंगल्यात आणले होते.
सलीम सय्यद, अब्दुल सईद आणि अमन बर्नवाल हे तीन आरोपी त्याच्यासोबत होते. पाल गोव्यात आणि सिमल्यातही लपला होता, अशी माहिती पोलिसांनी मिळाली. गुरुवारी पोलिसांना पाल वर्सोवा येथे आल्याची माहिती मिळाली, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तर या प्रकरणातील इतर आरोपींनाही वर्सोवा व बोरिवली येथून पकडण्यात आले.
आतापर्यंत चार गुन्हे दाखलक्राइम ब्रांचने एकूण चार गुन्हे दाखल केले होते. ज्यात व्यापारी राज कुंद्रा, अभिनेत्री-मॉडेल गेहना वसिष्ठ यांच्यासह इतरांना अटक करण्यात आली होती. फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रॉपर्टी सेलने पॉर्न फिल्म रॅकेटचा पर्दाफाश केला होता आणि मालवणी पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल केले होते.