जळगाव - दरोड्याच्या तयारी असलेल्या मुंबईतील चार जणांना पोलिसांनी अटक केल्याची घटना आज पहाटे तीन वाजता भुसावळात घडली. त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यातील एक जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. मोहीददीन शेख निजामुद्दीन शेख (वय ४०) राहणार काझी वाडा पाईप लाईन, साकी नाका, अंधेरी, शाकीर हैदर शेख (वय ४०) हा मुंब्रादेवी रोड येथे राहणार असून आरोपी अफलोज इस्लाम शेख (वय २३) हा नालासपोरा धानु बाग येथे राहणार आहे आणि हुसेन मोहंम्मद रफीक शेख (वय २८) हा रमाबाई चाळ रु.नं.६५, अंधेरी येथे राहणार असून या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांच्याकडून चॉपर, लोखंडी कोयता, लोखंडी सुरी, दोन मोबाईल, साडेसात हजार रुपये रोख, मिरचीची थैली व चारचाकी वाहन असे एक लाख दहा हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यापैकी शाकीर शेख व अफलोज शेख याच्याविरुद्ध चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तपास पोलीस उपनिरीक्षक निशिकांत जोशी करीत आहे