ठाणे: ठाणे येथील गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने ड्रग्ज प्रकरणात अटक तीन नायझेरीयनचा आणखी एक साथीदाराला मीरारोड येथून अटक केली आहे. त्यामुळे या एमडी ड्रग्ज प्रकरणातील गुन्हेगारांची संख्या चार झाली आहे.
या पथकाने २४ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास तीन नाझेरियन नागरिकांना कोकेन व एमडी ड्रग्ज विक्री करतांना अटक केली होती. त्यांची झडती घेतल्यानंतर ६० ग्रॅम कोकेन व ७० ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) असा एकुण २७ लाख ६७ हजार २५० रुपये किंमतीचे ड्रग्ज साठा आढळून आला होता. या तिघांच्या अटकेनंतर त्यांचा आणखी एक साथीदार मीरारोड येथून ताब्यात घेतला. या गुन्ह्यात आतापर्यंत अटक केलेल्या नायझेरियन गुन्हेगारांचा संख्या चार झाली आहे.
पहिल्यांदा अटक केलेल्या या नायजेरियन नागरिकांना ठाणे न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी दरम्यान आरोपींची कसून चौकशी करण्यात आली असता त्यांच्या एका आणखी ड्रग्ज पेडलर साथीदाराचे नाव समोर आले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने मीरा रोड येथून गॉडविन नुबुसी जेरोमे (३४) यास बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून पोलिसांनी सहा लाख ४० हजार रुपये किमतीचे १६ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत अटक केलेल्या नायझेरियन गुन्हेगारांचा संख्या चार झाली आहे.