समुद्रपूर( वर्धा): जाम- समुद्रपूर मार्गांवरील रेनकापूर जवळ दुचाकीच्या समोरासमोर धडकेत चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारात घडली.
प्राप्त माहिती नुसार धुमनखेडयावरून परडा येथे मामा आणि भाची स्कुटी क्रमांक एम एच 32 ए किव्ह 0848 ने जातं असतांना विरुद्ध दिशेने येणारी दुचाकी समोरासमोर धडकली. झालेल्या अपघातात राजेश महाकाळकर (४४) रा धुमनखेडा व त्यांची भाची स्नेहल नारायण टिपले (२१) रा. परडा गंभीर जखमी झाले आहे.
जाम कडून येत असलेल्या हिरो होंडा दुचाकी क्रमांक एम एच 31 ए व्ही 8223 वरील चालक विक्रम मोजे (२५) रा. जाम आणि शादीक शेख (३०) रा जाम दोघेही या घटनेत जखमी झाले.दोन्ही दुचाकीच्या समोरासमोर झालेली धडक जबर असल्याने चार जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद समुद्रपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली.