भाईंदर- पोलीस असल्याची बतावणी करून महिला - पुरुषाचे अश्लील फोटो काढत कारवाईच्या नावाखाली २८ हजारांची खंडणी उकळणाऱ्या त्रिकुटाविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, अन्य दोघा साथीदारांचा शोध पोलीस घेत आहे.दहिसर येथे राहणारे तुषार कोठारी (४५) हे आपल्या मित्रासह मीरारोडच्या शांती विद्यानगरी भागातील एका इमारतीत राहणाºया परिचीत मैत्रिणीकडे ३० मार्च रोजी रात्री ८ च्या सुमारास भेटण्यास गेले होते. तिघे गप्पा मारत बसले असताना अचानक तिघेजण आत शिरले. त्यातील दोघांनी आपण पोलीस असल्याचे, तर एकाने मानवी हक्क आयोगाचा सदस्य असल्याचे सांगत दमदाटी सुरु केली.तुषार आणि मैत्रिणीस त्यांनी बेडरुममध्ये नेत कपडे काढण्यासाठी धमकावण्यास सुरूवात केली. दोघांनी कपडे काढल्यानंतर त्यांचे फोटो घेउन सर्वत्र व्हायरल करु आणि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करु, अशी धमकी दिली. कारवाई टाळायची असेल, तर त्यांच्याकडे २ लाखांची खंडणी मागीतली. तुषारकडील २८ हजार रोख व १ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश काढून घेत तिघेही निघून गेले.दुसºया दिवशी पुन्हा कोठारींना फोन करुन उर्वरित १ लाख ७० हजार रुपयांची मागणी त्यांनी चालवली होती. सततच्या तगाद्याला कंटाळून अखेर कोठारी यांनी काशिमीरा पोलीस ठाणे गाठून घडला प्रकार सांगितला. बदनामीच्या भितीने कोठारी आधी फिर्याद देण्यास तयार नव्हते. पण पोलिसांनी धीर दिल्यानंतर १८ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला. पोलीस असल्याचे सांगून खंडणी प्रकार गंभीर असल्याने ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड, अपर अधिक्षक संजयकुमार पाटील यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला. आरोपींच्या शोधासाठी काही पथकं नेमण्यात आली.सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक भुपेंद्र टेलरसह अनिल वेळे, किशोर वाडीले, चंद्रकांत पोशिरकर, संदिप शिंदे, अर्जुन जाधव, अशोक पाटील, संजय शिंदे, अविनाश गर्जे, पुष्पेंद्र थापा, सचीन सावंत, प्रदिप टक्के, व महेश वेल्ले यांच्या पथकाने गुन्ह्याची पध्दत पाहून आधी दाखल झालेले गुन्हे आणि त्यातील आरोपींची माहिती घेण्यास सुरवात केली. त्यातून नवघर पोलीस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी दाखल झालेल्या अशाच एका गुन्ह्यातील अटक आरोपी राघवेंद्र उर्फ रघु हनुमंत औटगीरी (३८) रा. साई पराग बिल्डींग, शिर्डी नगर आणि अयुब रेहमान खान व प्रेम राजन सिवन तीघेही रा. भार्इंदर पूर्व यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. या तिघांवर पोलीस असल्याची बतावणी करुन २८ लाखांची खंडणी उकळल्याचा गुन्हा गिरगाव पोलीस ठाण्यातदेखील दाखल असल्याचे समोर आले.आरोपींकडे पोलिसांची बनावट ओळखपत्र, महिला साथीदार असण्याचीही शक्यतापोलीस असल्याची बतावणी करून खंडणी उकळणाºया तीनही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू असताना, खबरीच्या माहितीवरुन ४ मे रोजी रात्री राघवेंद्र याला नवघर भागातून अटक करण्यात आली.आरोपी राघवेंद्र याने अयुब व प्रेमसोबत मिळून गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. गुन्हा करतेवेळी आरोपी हे पोलिसांसारखी पँट, काळे वा लालसर बुट घालून जायचे.आरोपींच्या केसांचा कटसुध्दा पोलिसांसारखा असायचा. त्यांच्याकडे बनावट पोलीस ओळखपत्र होते. आरोपींच्या साथीदारांमध्ये एका महिलेचाही समावेश असण्याची शक्यतासुध्दा वर्तवली जात आहे.
अश्लील फोटो काढून पोलिसांच्या नावाखाली उकळली खंडणी, तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 1:31 AM