मीरारोड - वीज बिल भरले नसल्याचे संदेश पाठवून लोकांची ऑनलाईन फसवणूक केली जात असल्याने नागरिकांनी सावध राहावे असे सांगून देखील लोकं फसवणुकीला बळी पडत आहेत. भाईंदरच्या एका महिलेच्या बँक खात्यातून अश्याच प्रकारे ९० हजार रुपये लंपास करून फसवणूक करण्यात आली आहे.
भाईंदर पूर्वेच्या नवघर हनुमान मंदिर जवळील सोळंकी पार्क मध्ये प्रतिभा मिश्रा (३२) राहतात . त्यांचा भाऊ विकासाच्या मोबाईल वर वीज बिल भरले नसल्याने आज रात्री पासून वीज पुरवठा खंडित करणार असल्याचा संदेश ११ जुलै रोजी आला. त्यात वीज विभाग आणि एक मोबाईल क्रमांक दिला होता . विकास ने प्रतिभास तो मॅसेज पाठवून बिल भरण्यास सांगितले . प्रतिभा हिने बिल भरून त्याचा स्क्रिनशॉट विकासाला पाठवला आणि विकासने त्या संदेश मधील क्रमांकावर पाठवला . तेव्हा त्या क्रमांकावरून विकासला कॉल आला कि, आपण अदानी इलेक्ट्रिसिटी मधून बोल्ट असून तुमचे बिल पेमेंट अजून अपडेट झाले नाही. तुम्ही टीम व्हीवर क्विक सपोर्ट एप डाउनलोड करा आणि त्यातील फॉर्म भरा जेणे करून बिल अपडेट होईल असे सांगितले .
समोरच्या व्यक्तीने सांगितल्या नुसार प्रतिभा यांनी तो एप डाउनलोड करून त्यातील ओनिअलीं फॉर्म भरला आणि गुगल पे चा पासवर्ड टाईप करून ठेवला . त्या व्यक्तीने एक मोबाईल क्रमांक इलेक्ट्रिकसीटी म्हणून सेव्ह करायला सांगितला. नंतर प्रतिभा यांना आलेला संदेश कॉपी करून त्या सेव्ह केलेल्या क्रमांकावर पाठवण्यास सांगितले . नंतर मात्र काही वेळातच प्रतिभा यांच्या बँक खात्यातून २५ हजार , ५० हजार व १५ हजार अशी एकूण ९० हजारांची रक्कम काढून घेण्यात आली . इतकी मोठी रक्कम कमी झाल्याने त्यांनी समोरच्या व्यक्तीस कॉल केला असता त्याने पैसे परत खात्यात जमा होतील सांगितले परंतु नंतर मात्र ते नंबर बंद आढळले . या प्रकरणी ११ जुलै रोजी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .