शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

खरवस विक्रीच्या बहाण्याने वृद्ध दाम्पत्याची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 3:54 PM

शहरात सध्या खरवस, म्हशीचा चीक विकायचा असल्याचा बहाणा करुन घरात प्रवेश करुन दागिने लांबविणाऱ्या टोळीने धुडगुस घातला आहे़.

ठळक मुद्देभारती विद्यापीठ, समर्थ या पोलीस ठाण्याच्या हद्दीतही फसवणुकीचे प्रकार : शहरातील पाचवी घटना

पुणे : खरवस, म्हशीचा चीक विकायचा असल्याचा बहाणा करुन घरात प्रवेश करुन ज्येष्ठांच्या गळ्यातील दागिन्यांप्रमाणे दागिने बनवायचे असल्याचे सांगून दागिने लांबविणाऱ्या टोळीने शहरात सध्या धुडगुस घातला आहे़. त्यांच्या या बहाण्याला कर्वेनगरमधील नवसह्याद्री सोसायटीमधील एक वृद्ध दाम्पत्य शिकार झाले आहे़. बाहेर उभ्या असलेल्या वडिलांना दागिने दाखवून आणतो असे सांगून त्यांनी त्यांच्याकडील ७५ हजार रुपयांचे दागिने हातोहात लांबविले़.याप्रकरणी प्रभाकर भास्कर गोसावी (वय ८८, रा़ नवसह्याद्री सोसायटी, कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, गोसावी हे आपल्या पत्नीसह बंगल्याच्या तळमजल्यावर राहतात़. वरच्या बाजूला त्यांचे नातू व इतर जण राहतात़. त्यांच्या बंगल्यात शुक्रवारी सकाळीच पावणे आठ वाजण्याच्या सुमारास दोघे जण आले़. त्यांनी गोसावी यांच्या पत्नीला खरवस विक्रेते असल्याचे सांगितले़. त्यावेळी प्रभाकर गोसावी यांनी चौकशी केल्यावर त्यांना तुम्हाला ओळखतो़ लग्न पत्रिका देण्यासाठी आलो असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला़. त्यानंतर त्यांनी गोसावी यांना तुमच्या गळ्यातील सोन्याच्या चैन व हातातील अंगठीचे डिझाईन बघण्यासाठी मागितले़ ते पहाण्याचा बहाणा करुन आम्हालाही अशाच डिझाईनचे दागिने करायचे आहेत़ असे सांगून वडील बाहेर थांबवले आहेत, त्यांना दाखवून आणतो, असे सांगून ते ७५ हजार रुपयांचे ३१ ग्रॅम सोनसाखळी व अंगठी घेऊन पटकन निघून गेले़. काही वेळाने गोसावी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला़. यापूर्वी सुमारे दीड महिन्यांपूर्वी अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे एका महिलेची फसवणूक करण्यात आली होती़. तसेच भारती विद्यापीठ, समर्थ या पोलीस ठाण्याच्या हद्दीतही असेच फसवणुकीचे प्रकार घडले होते़. त्यातील फिर्यादीने सांगितलेले चोरट्यांचे वर्णन आणि या घटनेतील चोरट्यांचे वर्णन यात साम्य दिसून येत आहे़. वडगाव ब्रुद्रुक परिसरात एका वृद्ध दाम्पत्याला म्हशीचा चीक देण्याचा बहाणा करुन बोलण्यात गुंतविले़. त्यानंतर त्यांच्या पत्नीला तुमव्या गळ्यातील मंगळसुत्र छान दिसते़ असेच डिझाईने मंगळसुत्र आम्हाला करायचे आहे, असे सांगितले व २ हजार  रुपयांची नोट सुटी करुन घेऊन येतो, असे सांगून चोरटे पळून गेले होते़. कोथरुड परिसरात एका दाम्पत्याला म्हशीचा चीक देण्याचा बहाणा करुन १ लाख रुपयांचे दागिने चोरुन नेले होते़. कात्रज येथील राजस सोसायटीत राहणारे श्रीभुषण कुलकर्णी यांना तिघांनी हाक मारुन आम्ही शेजारच्या गोठ्यातून चीक आणला आहे़, असे सांगून गाईसाठी गहू किंवा तांदुळ द्या अशी मागणी केली़. त्यानंतर पाणी पिण्याच्या बहाण्याने ते स्वयंपाकघरात शिरले़. कुलकर्णी यांच्या आईला बोलण्यात गुंतवून तुमच्या गळ्यातील दागिने छान आहेत, असे म्हणून पहायला घेऊन दागिने घेऊन फरार झाले़.

टॅग्स :PuneपुणेtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस