पुणे : कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रात ऑनलाईनचे व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे सायबर चोरटे वेगवेगळे बहाणे सांगून लोकांची फसवणूक करु लागले आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून रुग्णांशी जेवढा संपर्क टाळणे शक्य होईल, तेवढा टाळण्याचा डॉक्टरांचाही प्रयत्न असतो. त्याचा गैरफायदा सायबर चोरटे उठवून लागले आहेत़. या सायबर चोरट्यांनी ऑनलाईन पेशंट तपासणीकरीता अॅप डाऊन लोड करुन देण्याच्या नावाखाली चक्क एका महिलाडॉक्टरला ९१ हजार रुपयांना गंडा घातला.या प्रकरणी कात्रज येथील एका ४३ वर्षाच्या महिला डॉक्टरने भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना ३० व ३१ मे दरम्यान ऑनलाईनच्या माध्यमातून घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिला त्यांच्या खासगी हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना एक फोन आला. त्याने ऑनलाईन पेशंट तपासणीसाठी टीम व्हीवर व क्लीक सपोर्ट हे अॅप डाऊन लोड करुन देतो, असे सांगून त्यांच्या कडून सर्व माहिती घेतली. त्यानंतर ३० व ३१ मे या दोन दिवसात त्यांच्या बँक खात्यातून ६ वेळा ऑनलाईन ट्रान्झेक्शन करुन ९१ हजार ७३९ रुपये ट्रान्सफर करुन फसवणुक केली.पोलीस निरीक्षक ताम्हाणे अधिक तपास करीत आहेत.
ऑनलाईन पेशंट तपासणीचे अॅप देण्याच्या नावाखाली महिला डॉक्टरची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 1:53 AM
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सायबर चोरट्यांची नवी शक्कल
ठळक मुद्देअॅप डाऊन लोड करुन देण्याच्या नावाखाली महिला डॉक्टरला ९१ हजार रुपयांना गंडा