पुणे : गॅस सिलेंडर बुक करण्साठील गुगलवर सर्च करुन मिळालेल्या नंबरवरुन सिलेंडर बुक करणे, आयटी इंजिनियरला भलतेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी या तरुणाच्या दोन खात्यातून तब्बल १ लाख ४ हजार ४०० रुपये ऑनलाईन काढून घेऊन फसवणूक केली आहे.याप्रकरणी खराडी येथील एका २४ वर्षाच्या आय टी इंजिनियरने चंदननगरपोलिसांकडे फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आयटी इंजिनियर थिटे वस्ती येथील झेन्सार आय टी पार्कमध्ये राहतो. त्याने गॅस सिलेंडरच्याबुकिंगसाठी भारत गॅस एजन्सीचा नंबर गुगलवर सर्च केला. त्यानंतर त्यांनीसंबंधित क्रमांकावर संपर्क साधला. तो मोबाईल घेणाऱ्याने त्यांना गॅसबुकींग करण्यासाठी ऑनलाईन लिंक पाठविली. त्यामध्ये माहिती भरायलासांगितली. ती माहिती फियार्दी तरुणाने १० जून रोजी भरुन पाठविली.त्यानंतर दुपारी ३ वाजता त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून ४ हजार ५००रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आले. ११ जून रोजी सायंकाळी सव्वा पाचवाजता त्यांच्या दुसऱ्या एसबीआय बँक खात्यामधून युपीआय मार्फत ९९ हजार ९०० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर झाल्याचा मेसेज त्यांना आला. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके अधिक तपास करीत आहेत
गॅस बुकिंगच्या नावाखाली आयटी इंजिनियरला लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 4:43 PM
सायबर चोरट्यांनी या तरुणाच्या दोन खात्यातून ऑनलाईन काढून घेतले तब्बल १ लाख ४ हजार ४०० रुपये
ठळक मुद्देयाप्रकरणी खराडी येथील एका २४ वर्षाच्या आयटी इंजिनियरची चंदननगर पोलिसांकडे फिर्याद