पिंपरी : करोडपती होण्याची संधी असल्याचे आमिष दाखवून तरुणीची दीड लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकित वानखेडे (रा. बाणेर), गणेश ढोमसे (रा. मुंबई), शर्वरी मालुष्ट (रा. पिंपळे सौदागर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ऐश्वर्या किरण चावरे (वय २३, रा. संत तुकारामनगर, पाण्याच्या टाकीसमोर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने चावरे यांना क्युनेट कंपनीमधून करोडपती होण्याची संधी असल्याचे खोटे सांगितले. चावरे यांचा विश्वास संपादन करुन त्यांना कंपनीत १ लाख ५७ हजार रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर चावरे यांचे खोटे रजिस्ट्रेशन करुन कंपनीचे प्रोडक्ट न देता तसेच क्युनेट कंपनीचे ऑफिसही दाखविले नाही. यासह कोणताही मोबदला अथवा पैसे परत न करता चावरे यांची फसवणूक केली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
करोडपती होण्याचे आमिष दाखवून तरुणीची दीड लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 6:23 PM