लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशभरात ख्याती असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांना मोफत दुचाकी देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या डबेवाला असोसिएशनचा माजी अध्यक्ष सुभाष तळेकरला अखेर मंगळवारी घाटकोपर पोलिसांनी पुण्यातून अटक केली.
डबेवाल्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत त्यांना मोफत दुचाकी देण्याचे आश्वासन देत तळेकरने २०१५मध्ये वेगवेगळ्या कागपत्रांवर सह्या घेतल्या. अशात, तळेकर आणि त्याच्या साथीदारांनी या सह्यांच्या वापर करून भैरवनाथ पतसंस्थेकडून डबेवाल्यांच्या नावाने वाहन कर्ज घेऊन एकरकमी धनादेश डिलरकडे सुपूर्द केला. पण प्रत्यक्षात त्याने फक्त १५ डबेवाल्यांना मोपेड गाड्या दिल्या, तर २३ डबेवाल्यांना गाड्यांची नोंदणी न करता गाड्या दिल्या व उर्वरितांना गाड्याच दिल्या नाहीत. परंतु त्यांच्या नावे कर्ज लाटले. वाहन न मिळाल्याने सुरुवातीला डबेवाल्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अशात २०१९मध्ये कर्जाची परतफेड न केल्यामुळे मालमत्ता जप्तीच्या नोटीस डबेवाल्यांना बजावण्यात आल्या. यात फसवणूक झाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
सहानुभूतीचा केला वापरn सुभाष तळेकरने वेगवेळ्या क्षेत्रात डबेवाल्यांच्या सहानुभूतीचा वापर करून लाखोंचा निधी बळकावला. n डबेवाल्यांच्या नावाने फक्त कौटुंबिक व्यक्तींना सोबत घेऊन बोगस संस्था स्थापन केली. n कोरोना काळात डबेवाल्यांना करण्यात येणाऱ्या वस्तुरूपी आणि आर्थिक मदतीचा घोटाळा केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी डबेवाला संघटनेकडून होत आहे.