पिंपरी : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांची दोन व्यक्तींनी एक लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कोत्तापल्ले यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना २४ सप्टेंबर ते २५ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत घडली. नागनाथ लालुजीराव कोत्तापल्ले (वय ७०, रा. रो हाऊस नंबर ०४, प्लॅनेट मिलिनियम सोसायटी, कुणाल आयकॉन रोड, पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रेणुका आचार्य, प्रशांत दिक्षित (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलल्या माहितीनुसार, रेणुका आचार्य आणि प्रशांत दिक्षित यांनी कोत्तापल्ले यांच्या फोनवर तसेच ई-मेल आयडीवर वारंवार संपर्क साधून एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये कोत्तापल्ले यांची पॉलिसी नसताना तिचे जास्त पैसे मिळतील असे आमिष दाखविले. तसेच आरोपींनी त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात एक लाख रुपये भरण्यास कोत्तापल्ले यांना प्रवृत्त केले. यातून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कोत्तापल्ले यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांची एक लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 2:54 PM
ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांची दोन व्यक्तींनी एक लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
ठळक मुद्देइन्शुरन्स कंपनीमध्ये कोत्तापल्ले यांची पॉलिसी नसताना जास्त पैसे मिळण्याचे आमिष आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात एक लाख रुपये भरण्यास कोत्तापल्ले यांना प्रवृत्त