येवला (जि. नाशिक) : येथील व्यापार्याचा ६ लाख ३२ हजार रुपयांचा कांदा परस्पर अन्यत्र विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १८ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. (Fraud of onion trader in Yeola, two suspects in police custody)येवला येथील कांदा व्यापारी सुमीत सुभाष समदडीया यांच्या फिर्यादीवरून संशयित प्रवीण एकनाथ अहिरे (नाशिक), सादिक युसुफ पटेल (पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे), पंकज उर्फ बंदी शिंदे (आडगाव, जि. नाशिक) यांच्यासह पिंपळनेर (ता. साक्री) येथील अन्य तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदा व्यापारी समदडीया यांचा कांदा ओडिसा (कोयकाबाजार) येथील चंदनेश्वर एन्टरप्रायजेस येथे पोहोच करण्यासाठी विश्वासाने संशयितांना गाडीत भरून दिला असता, त्यांनी कांदा ओडिसा येथे पोहोच न करता अन्यत्र विक्री करून समदडीया यांची फसवणूक केली.
येवल्यातील कांदा व्यापाऱ्याची फसवणूक, दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 3:58 AM