नालासोपारा : पूर्वेकडे राहणाऱ्या महिलेच्या घरी जाऊन जवळीक साधून दुबई, ओमान या देशात चांगली नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून, महिलेच्या नावावर दुबई येथून पैसे घेऊन तिला न सांगता ओमान देशात पाठवून सांगितलेली नोकरी न देता दुसरी नोकरी दिल्याप्रकरणी मुलाच्या तक्र ारीवरून तुळींज पोलिसांनी दोघांविरु द्ध वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तो तपासाकरिता अनैतिक मानवी व्यापार शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडवरील राजनगर परिसरातील साई भरणी सोसायटीच्या फ्लॅट बी/३१० मध्ये राहणा-या सरोज बजरंगलाल वर्मा (40) यांच्या घरी 13 सप्टेंबर २०१८ पासून आरिफ याने वारंवार येऊन संपर्क वाढवून जवळीक साधून दुबई, ओमान या देशात चांगली नोकरी देण्याचे आमिष दाखवून अश्मिर याने सरोज यांचा व्हिसा बनवून संगनमत करून दुबईत सरोज यांना नोकरी देण्यासाठी रक्कम घेतली पण त्यांना याबाबत काहीही न सांगता ओमान या देशात पाठवून दिले. तसेच त्या ठिकाणी सांगितलेल्या चांगल्या कामाव्यतिरिक्त दुसरे काम देऊन तिची पिळवणूक केली आहे.महिलेच्या कामाचा मोबदला तिला किंवा घरच्यांना न देता त्यांची फसवणूकही करण्यात आली आहे. सरोज यांचा मुलगा अविनाश (१९) याने आईची फसवणूक करून दुसºयादेशात पाठवल्याबद्दल अनैतिक मानवी व्यापार शाखेत तक्र ार अर्ज केला होता.तुळींज पोलिसांनी शुक्र वारी रात्री पिडित महिलेच्या मुलाच्या तक्र ारीवरून आरिफ आणि अश्मीर विरोधात फसवणूक, अपहरण या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत.
परदेशात नोकरी देण्याचे सांगून महिलेची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 12:39 AM