पिंपरी : जीवनसाथी डॉट कॉम या विवाहविषयक संकेतस्थळावर माहिती टाकल्याने एकजण संपर्कात आला. टर्की या देशातून पुण्यात येणार आहे. दिल्ली विमानतळावर आलेले पार्सल सोडवुन घेण्यासाठी पैशांची गरज आहे, असे भासवुन भामट्याने पिंपळेगुरव येथील फिर्यादी महिलेला दोन वेगवेगळ्या ईमेल आयडीवरून पैशांची गरज असल्याचे कळविले. २ लाख ८६ हजार ९१० रुपए आॅनलाईन बँक खात्यात भरण्यास सांगितले. नंतर मात्र तिच्याशी संपर्क तोडला. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच, महिलेने सांगवी पोलिसांकडे फसवणुक झाल्याची फिर्याद मंगळवारी दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळेगुरव येथील विल्यमनगर मध्ये राहणाऱ्या 3० वर्षीय महिलेने सांगवी पोलिसांकडे अज्ञात तीन जणांविरूद्ध फिर्याद दाखल केली आहे. ज्याने मोबाईलवरून संपर्क साधला. तो मोबाईलधारक तसेच बँक खाते क्रमांक देणारा आणि इ मेल पाठविणारा अशा तीन आरोपींविरोधात फिर्याद दाखल झाली आहे. विवाहविषयक संकेतस्थळावर दिलेल्या माहितीच्या आधारे भामट्याने महिलेशी संपर्क साधला. तिचा विश्वास संपादन केला. टर्की देशातून लवकरच पुण्यात येणार आहे. काही रक्कम आणि साहित्य कुरिअरने दिल्ली विमानतळावर पाठविले आहे. कस्टम अधिकाºयांकडून हे साहित्य सोडवुन घ्यायचे आहे. त्यासाठी काही रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम खात्यावर भरावी, असे मेलव्दारे महिलेला कळविले. महिलेने त्या खात्यावर रक्कम भरली. त्यांनतर मात्र मेल नाही, मोबाईलवर संपर्क नाही. त्यामुळे फसवणुक झाल्याचे लक्षात आले. महिलेने फिर्याद दाखल केली असून सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
विवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख पडली महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 18:40 IST
जीवनसाथी डॉट कॉम या विवाहविषयक संकेतस्थळावर माहिती टाकल्याने एकजण संपर्कात आला. टर्की या देशातून पुण्यात येणार आहे.
विवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख पडली महागात
ठळक मुद्देदोन लाख ८० हजाराला आॅनलाईन गंडा तीन आरोपींविरोधात फिर्याद दाखल