लाहोर - पाकिस्तानमधील लाहोर येथे नॅबने (नॅशनल अकाऊंटॅबिलिटी ब्युरो) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा लहान भाऊ आणि पंजाबचे (पाकिस्तान) माजी मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांची सर्व संपत्ती जप्त करण्याचे आदेश जारी केले आहेत. नॅबने मंगळवारी पंजाबचे माजी मुख्यमंत्री शाहबाज शरीफ आणि त्यांचा ममुलगा हमजा आणि सुलेमान यांच्या २३ मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. मनी लाउंडरिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
शाहबाज, हमजा, सुलेमान आणि इतरांवर भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली केलेल्या तपासात असे आढळले आहे की शहबाजने आपल्या पत्नी नुसरत शाहबाज शरीफ आणि देहमिना दुरानी यांच्या नावे मालमत्ता मिळवली आहे. जप्त केलेल्या मालमत्तांपैकी लाहोरच्या जोहर टाउनमधील नऊ भूखंड, ज्युडिशियल कॉलनीतील चार, मॉडेल टाऊनमधील दोन घरे आणि डीएचएमधील अनेक घरे आहेत. शिवाय, नॅबने पीर सोहवामधील एक कॉटेज आणि व्हिला तसेच चिनिओटमध्ये आणखी दोन भूखंड जप्त केले आहेत.