मैत्रिणीवरील विश्वास नडला; प्लॅन बनवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार घडवून आणला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 07:09 PM2020-06-22T19:09:54+5:302020-06-22T19:15:22+5:30
बलात्कार आणि त्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत.
मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पीडित मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणीने आरोपींना मदत केली. बलात्कार आणि आरोपींना मदत केल्याच्या आरोपाखाली सहा आरोपींना पोलिसांनीअटक केली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत.
देवास जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कृष्णा वेणी देसावती यांनी रविवारी माहिती दिली की, एका १३ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात आरोपींना मदत करणार्या अल्पवयीन मुलीसह सहा आरोपींना रविवारी अटक करण्यात आली. अन्य तीन आरोपी अद्याप फरार आहेत, त्यांचा शोध सुरू आहे. पुढे ते म्हणाले की, पीडित मुलीचे आरोपींनी तिच्या अल्पवयीन मैत्रिणीच्या मदतीने १५ जूनला देवास रेल्वे स्थानकातून अपहरण केले होते. १६ जून रोजी पीडित मुलीच्या वडिलांनी कोतवाली देवास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पीडित मुलगी मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील असून ती देवास येथे मावशीच्या घरी राहून शिक्षण घेत आहे. त्यांनी पुढे सांगितले की, मैत्रिण तिला तिच्या अॅक्टिव्हावर बसवून देवास रेल्वे स्टेशनहून शहरातील हॉटेलमध्ये घेऊन गेली आणि हॉटेलच्या रिसेप्शनिस्टने विना ओळखपत्र रूम बुक केली, तिथे आरोपी रोहित खटीक (२३), अजय खटीक ( २०) आणि विशाल गोस्वामीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
आरोपींनी नंतर पीडित मुलीला त्याच्या इतर दोन साथीदार अमन खटीक (१८) आणि नितेश तिवारी (१९) यांच्याकडे दिले. या दोघांनीही पीडित मुलीवर बलात्कार करून तिला चित्तोडगढ़ आणि राजस्थानच्या जयपूर येथे आणले. नंतर जयपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने हे दोन्ही आरोपी आणि पीडित मुलगी ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणातील आरोपींविरोधात भा. दं. वि. कलम ३७६, ३६८ आणि पॉक्सो कायदा तसेच अनुसूचित जाती व जमाती कायद्यान्वये गुन्हा नोंदवून सखोल चौकशी सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमन, नितेश, लोकेश लाल (३५) आणि तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पीडित मुलीची अल्पवयीन मैत्रीण आणि दोन हॉटेल कामगार यांचा देखील समावेश आहे. तसेच आरोपी रोहित, अजय आणि विशाल फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. या आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक देवासद्वारे पोलीस पथकाला दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. अशी माहिती अमर उजालाला देण्यात आली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष
धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार
पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना
Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली
६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहारमधून तळोजा जेलमध्ये पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती