मुंबई - कॉलेजचा मित्र असल्याचे भासवून वेगवेगळ्या बनावट इंस्टाग्राम अकाउंटवरून तरुणीशी संवाद साधायचा. पुढे खासगी व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, पैशांची मागणी करणाऱ्या विकृताला गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने बेडया ठोकल्या आहेत. कमेल मोहम्मद हनीफ पटनी (२५) असे अटक आरोपीचे नाव आहे.
बांगुरनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. २१ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीत एक तरुण वेगवेगळ्या इंस्टाग्राम अकाउंट वरून संपर्क साधून खासगी व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर करण्याची धमकी देत आहे. तसेच तिच्याकडून पैशांची मागणी होत असल्याने, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हे शाखेच्या कक्ष ११ चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरु केला.
तांत्रिक पुराव्याच्या आधारे वांद्रे येथून संशयित म्हणून पटनीला अटक केली. तसेच त्याच्या मोबाईलमध्ये तरुणीसोबत कलेल्या संवादाचे स्क्रिनशॉट तसेच काही व्हिडीओ होते. गुन्हे शाखेने पटनीला ताब्यात घेत, बांगुरनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यानुसार बांगुर नगर पोलिसांनी त्याला या गुह्यांत अटक केली आहे.पटनी हा वांद्रे येथील रहिवासी आहे. त्याच्याकडे बांगुरनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबावर दबाव; वकीलाने लावला गंभीर आरोप
लोअर परेल येथून २१ लाख किंमतीच्या बनावट एन -९५ मास्कचा साठा जप्त
स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश
...म्हणून बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकल्याने रियाने घेतली सुप्रीम कोर्टात धाव
भिवंडीत मित्रांसोबत पोहायला गेलेल्या इसमाचा मृत्यू
Video : लेकीसाठी आई चक्क चढली एसपी कार्यालयासमोरील झाडावर अन् केला आत्महत्येचा प्रयत्न
खळबळजनक! गवळी गँगच्या हस्तकाची तळोजा कारागृहात आत्महत्या
तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्...