गोरखपूर – कानपूरचे प्रॉपर्टी डीलर मनिष गुप्ता यांचा गोरखपूर पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू होण्यापूर्वीचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यात पोलीस कर्मचारी हॉटेलमध्ये मनिष आणि त्याच्या मित्राच्या रुमची चेकिंग करत होते. हॉटेलच्या या रुममध्ये रामगढताल ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगत नारायण सिंह, उपनिरीक्षक अक्षय मिश्रा तपासणी करत होते. या फोटोत मनिष आणि त्याच्या मित्रांच्या कागदपत्रांची तपासणी करताना पोलीस दिसून येत आहेत.
तर दुसऱ्या फोटोत मनिषचा मित्र बॅग उघडताना पाहायला मिळत आहे. दोन्ही फोटोत मनिष गुप्ता दिसत आहे. या फोटोतून स्पष्ट होतं की, जेव्हा पोलीस रुममध्ये आले तेव्हा मनिष त्याच्या बेडवर झोपला होता. चेकिंगदरम्यान मनिषने त्याच्या एका नातेवाईकाला फोन लावला. पोलीसवाले आलेत. तपासणी करतायेत. त्यानंतर पोलीस आणि मनिष गुप्ता यांच्यात वाद झाला. चेकिंगवेळी पोलिसांनी मनिषला मारहाण केल्याचा आरोप त्याची पत्नी मिनाक्षीने लावला आहे. पोलिसांच्या मारहाणीतच पतीचा मृत्यू झाल्याचा दावा पत्नीने केला आहे.
पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?
मनिषच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम करण्यात आलं त्यात मनिषच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याच्या खूणा आढळल्या आहेत. मनिष गुप्ताच्या शरीरावर ४ गंभीर खूणा आढळल्या. मनिषच्या डोक्याला झालेली जखम जीवघेणी ठरली आहे. डाव्या हाताच्या मनगटावर दांडके मारल्याचं निशाण आहे. मनिषला दांडक्याने मारहाण झाल्याचं दिसून येते. तर उजव्या डोळ्याच्या वर मारहाण झाल्याचं आढळत आहे.
मला न्याय द्या...! ४ वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन आई वणवण भटकतेय; काय घडलंय?
मनिष गुप्ता मारहाण प्रकरणात आतापर्यंत ६ पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यात एसएचओ जगत नारायण सिंह, अक्षय मिश्रा, विजय यादव, राहुल दुबे, कॉन्स्टेबल कमलेश यादव, प्रशांत कुमार यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रॉपर्टी डीलर मनिष गुप्ता यांची पत्नी मिनाक्षीच्या तक्रारीवरुन ३ पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नाही.
मला न्याय द्या, मिनाक्षी वणवण भटकतेय
संतप्त झालेल्या पत्नीने पतीच्या मृत्यूच्या आक्रोश करत पोलीस दलावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. जर माझा मुलगा पोलीस बनणार असेल तर त्याला का बनायला सांगू? लोकांच्या रक्षणासाठी असणाऱ्या पोलिसांनीच माझ्या पतीचा जीव घेतला. लोकांना ठार करण हे पोलिसांचे काम आहे का? मिनाक्षीच्या या प्रश्नाची उत्तरं कुणाकडेच नाहीत. माझ्या नवऱ्याला मारहाण करण्यात आली. कुठल्या कायद्यातंर्गत पोलीस चेकिंगच्या बहाण्याने अर्ध्या रात्री खोलीत घुसले आणि मारहाण करत पतीचा जीव घेतला. या प्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार करूनही न्याय मिळत नाही. मला न्याय द्या असं मिनाक्षी म्हणत आहे.